घारपी धरणप्रश्नी
केसरकरांना निवेदन
सावंतवाडी ः घारपी-उडेली गावात धरण प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. मात्र, या धरण प्रकल्पात जमीन गेलेल्या मालकांना कोणतीच कल्पना न देता तेथे काम सुरू केले आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा, अशा मागणीचे निवेदन गावच्या शिष्टमंडळाने आमदार दीपक केसरकर यांना दिले आहे. आमदार केसरकर यांनी प्रांताधिकारी हेमंत निकम यांना यासंदर्भात लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. या शिष्टमंडळात सिद्धेश गावडे, रामा गावडे, गजानन गावडे, मनोहर गावडे, लहू गावडे, भगवान गावडे, शामसुंदर गावडे, रमेश गावडे यांचा समावेश होता. धरण प्रकल्पाचे भूमिपूजन केले. मात्र, आम्हाला कोणतीच कल्पना दिलेली नाही. या भागात परप्रांतीयांनी जमिनी परस्पर बळकावत लागवड केली आहे. प्रकल्पात ज्या जमिनी जाणार आहेत, त्या जमीनधारकांना नुकसानभरपाई निश्चित करावी, अशी मागणी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनाही निवेदन दिले.
---
नाणोस येथे महिलांची
मोफत आरोग्य चिकित्सा
सावंतवाडी ः नाणोस ग्रामपंचायत आणि आदिशक्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाणोस गावातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. विक्रम म्हस्के, सरपंच अमिता नाणोसकर, ग्रामपंचायत अधिकारी मुकुंद परब, आदिशक्ती समिती अध्यक्षा मयुरी कांबळी, ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर, रसिका जोशी, आरोग्य सहायक उमाजी राणे, समुदाय आरोग्य अधिकारी सिद्धी शेट्ये आरोग्यसेविका ज्योत्स्ना नवार, आरोग्यसेवक प्रशांत सावंत, सिमाली गवाणकर, नम्रता नाणोसकर, नयन कांबळी, रतिष्मा शेट्ये, बबन नाणोसकर, वासुदेव जोशी, राधाबाई शेट्ये आदी उपस्थित होते.
---
म्हापण किनारी उद्या
नारळी पौर्णिमा उत्सव
म्हापण ः दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी (ता. ८) खवणे समुद्र किनारी नारळी पौर्णिमा उत्सव होत आहे. यानिमित्त दुपारी ४ वाजता मानाच्या श्रीफळाची वाजतगाजत मिरवणूक, सायंकाळी ५ वाजता नारळ लढविणे स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम १०००, द्वितीय ७०० व तृतीय ५०० रुपये अशी बक्षिसे आहेत. स्पर्धकांसाठी स्पर्धेत मोफत प्रवेश असून, नारळ स्वतः आणावेत अथवा आयोजकांमार्फत चालू दराने नारळ उपलब्ध केले जातील. सायंकाळी ६ वाजता सागराला श्रीफळ अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी तसेच नारळ लढविणे स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी अभय शेलटकर, केतन कोचरेकर यांच्याशी संपर्क साधावा.
.....................
आंबोलीत रविवारी
‘मॉन्सून मॅरेथॉन’
आंबोली ः आंबोली ग्रामपंचायतीतर्फे रविवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजता आंबोली श्री देवी माऊली मंदिर, जकातवाडी येथून आंबोली मॉन्सून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. आंबोली गाव, परिसर हे वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. दरवर्षी लाखो पर्यटक आंबोलीत वर्षा पर्यटनाचा आनंद घेत असतात. एक नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून आंबोली परिक्षेत्रात सह्याद्री अॅडव्हेंचर आंबोली/सांगेली ग्रुपच्या माध्यमातून आंबोली मॉन्सून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धांमुळे आंबोलीची एक नवीन ओळख निर्माण होणार आहे. या स्पर्धेत स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सरपंच सावित्री पालेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.