- rat६p९.jpg-
P२५N८२५१८
संगमेश्वर ः कोसुंब-ताम्हाणे रस्त्याची झालेली दुरवस्था.
---
कोसुंब-ताम्हाणे रस्त्याची दुरवस्था
बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज ; दर्जाबाबत शंका
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ ः देवरूखजवळील कोसुंब ते ताम्हाणे या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ व प्रवाशांचे हाल झाले आहेत. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा संशय ग्रामस्थांकडून केला जात आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत कोसुंब-ताम्हाणे रस्त्याचे काम झाले होते. मात्र, त्या वेळी कामाच्या दर्जाबाबत तक्रारी उपस्थित केल्या होत्या. माजी उपअभियंत्यांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत काम पूर्ण करून घेतले. परिणामी, आता त्या रस्त्याची चाळण झाली आहे. दररोज शाळकरी मुले, वयोवृद्ध व नोकरीसाठी जाणारे नागरिक यांना या खडबडीत रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या रस्त्याच्या कामासंदर्भात कुठलाही माहिती फलक लावण्यात आलेला नाही. हे संपूर्ण काम गुप्तपणे ठेवले आहे, असा आक्षेप माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी घेतला आहे.
गुरव म्हणाले, या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अर्ज देण्यात येणार आहे तसेच, प्रत्यक्ष कार्यालयात जाऊनही याची सविस्तर माहिती दिली जाईल. दोषी अभियंता व संबंधित ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी केली आहे. सार्वजनिक निधी खर्च करून उभारलेल्या रस्त्याचे काम दीर्घकाळ टिकावे, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.