कोकण

रिल्स स्पर्धेतून खेड शहरातील खड्ड्यांवर प्रकाश

CD

रिल्स स्पर्धेतून खेडमधील खड्ड्यांवर प्रकाश
मनसेचा पुढाकार ; प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ६ : खेड-भरणे मार्गासह शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. ही बाब नगरपालिका प्रशासनापुढे मांडण्यासाठी खेड शहर मनसेने ‘रिल्स स्पर्धेचे’ आयोजन केले आहे. त्यासाठी ‘खड्ड्यात गेले खेड’ हा विषय देण्यात आला असून, प्रभावी आणि व्यंगात्मक रिल्स बनवणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती मनसे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांनी दिली.
खेड-भरणे मार्ग तीनबत्ती नाका छत्रपती शिवाजी चौक खेड-दापोली मार्ग खेड-भोस्ते मार्ग या ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी देखील प्रशासन केवळ मलमपट्टी करून प्रश्न धुवून टाकत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. ही स्पर्धा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जात असून तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष कानडे यांनी केले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात अतिवृष्टीचा कहर, पुढील ५ दिवस पाऊस धुमाकूळ घालणार; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Pune Crime : नवरात्रोत्सवात ४३ सराईत गुन्हेगारांची थेट कारागृहात रवानगी

Government Job: शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणार! महाराष्ट्र सरकार ५,५०० पदे भरणार, सहाय्यक प्राध्यापक भरतीबाबत मोठी अपडेट

Dhule News : धुळ्यात आजपासून नवरात्रोत्सवाचा उत्साह; खानदेश कुलस्वामिनी एकवीरादेवी मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले राहणार

Navratri Festival : 'उदे ग अंबे उदे' च्या गजरात माहूर गडावर घटस्थापना; नवरात्र उत्सवास प्रारंभ!

SCROLL FOR NEXT