कोकण

-शुक्रवारची कहाणी

CD

संतांचे संगती, गोष्टी कहाण्यांच्या------लोगो
(३१ जुलै टुडे ४)
मराठीतील समृद्ध धार्मिक वाङ्मयातील एक भक्तीरसपूर्ण दालन आपण पाहत आहोत. एखादे व्रत केल्यानंतर जेव्हा अपेक्षित फळ प्राप्त होते त्या वेळेला त्याची मस्ती येता कामा नये आणि ते व्रताचरण थांबवता कामा नये. हाच महत्त्वाचा बोध या कहाण्यांमधून दिला गेला आहे. अशा कहाण्यांमधील मला आवडणारी आणखी एक कहाणी म्हणजे शुक्रवारची कहाणी होय...!

-rat६p१८.jpg -
25N82521
- धनंजय चितळे
----
शुक्रवारची कहाणी
शुक्रवारच्या कहाणीत एक गरीब स्त्री आपल्या माहेरी असणाऱ्या एका कार्यक्रमाला न बोलावता अनाहूतपणे उपस्थित राहते. खरेतर, श्रीमंत असलेले भाऊ समाजातील खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्या गरीब बहिणीला जाणूनबुजून टाळत असतात; पण ती बिचारी, ‘अस्सं माहेर सुरेख बाई’ या वळणातील माहेरवाशीण मोठ्या कौतुकाने माहेरच्या कार्यक्रमात प्रेमाने हजर राहते. तिच्या भावांना तिचे येणे अजिबात आवडत नाही म्हणून, ते तिचा अपमान करतात. ती स्त्री झालेला अपमान गिळून आपल्या घरी येते. पुढे श्री लक्ष्मीमातेच्या कृपेने त्या स्त्रीची संपत्ती स्थिती बदलते. ती श्रीमंत होते. आता तिच्या भावांना तिच्याबद्दल आपुलकी वाटू लागते. ते तिला कौतुकाने माहेरी बोलवतात. तीही उत्तम साडी नेसून सर्व प्रकारचे अलंकार धारण करून माहेरी जाते‌. तिच्या भावजया तिला उत्तम शिसवी पाटावर जेवायला बसवतात. चांदीचे ताट वाटी ठेवतात, पानाभोवती रांगोळ्या काढतात आणि स्वादिष्ट अशी पंचपक्वान्ने वाढायला प्रारंभ करतात. ती स्त्री आपल्या अंगावरील दागिने एक एक करून पाटावर ठेवते आणि पानातील पंचपक्वान्ने एकेका दागिन्यांवर ठेवत जाते. ते पाहून आश्चर्यचकित झालेले भाऊ तिला विचारतात, ताई तू काय करतेस? त्यावर ती म्हणते, मला कल्पना आहे, तुमच्यामध्ये माझ्याबद्दलचे आलेले अगत्य आणि प्रेम हे या संपत्तीमुळेच आहे म्हणून मी तो मान या वैभवालाच देत आहे. या कथेतील त्या स्त्रीचा बाणेदारपणा वाचकांच्या मनाचा ठाव घेतो तसेच आपण इतरांशी कसे वागले पाहिजे याचा वस्तूपाठही या कहाणीतून मिळतो. आपली परिस्थिती सर्वकाळ सारखीच राहील, असे नाही. सर्व स्थितीत सर्वांशी प्रेमाने वागणे हाच खरा स्वधर्म आहे, असा बोध या कहाणीतून मिळतो. ज्याप्रमाणे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या उपासनेत नामसाधक म्हणतात,
प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माजी
हाची निरोप गुरूंचा, गुरूरायाला तहान प्रेमाची
त्याचप्रमाणे सर्वांनी वागायला हवे बरोबर ना?
ऋषिमुनींनी तपाचरण करून विविध विद्या प्राप्त करून घेतल्या त्याचप्रमाणे राक्षसांनीही आपल्या उग्रतापाने विविध वरांची प्राप्ती करून घेतली; मात्र ऋषिमुनी ध्येयपूर्तीनंतरही निरलस भावाने अखंड सेवारत राहिले याउलट राक्षस मिळालेल्या व्रताने उन्मत्त झाले आणि आपल्या सामर्थ्याने त्यांनी सर्व विश्वाला वेठीस धरले. ज्या भगवान शिवशंकरांनी वर दिला त्यांच्याच डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करायला निघालेल्या भस्मासुराचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. माणूस हा देव आणि दानव या दोन बिंदूंमध्ये फिरणारा एक लंबक आहे. कधी कधी त्यातील आसुरी भाव जागृत होतात आणि तो करू नये ते करतो. हे टाळण्यासाठी कहाणीकार त्याला सूचना देतात, उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको. ज्याप्रमाणे देवभक्तीचा वसा आहे त्याचप्रमाणे देशभक्तीचाही वसा प्रत्येकाने घेतला पाहिजे. देवसेवेइतकेच देशसेवेतही आपण रमले पाहिजे. आता लवकरच आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन येईल म्हणून पुढच्या भागात देशसेवाव्रताची कहाणी पाहूया.
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Gold Village: सोन्याचा पाऊस पडणारं गाव! महाराष्ट्रातील 'या सोनेरी गावाची' कहाणी तुम्ही ऐकलीये का?

Male News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! शनिवारपासून अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली पर्यटकांसाठी खुली, ऑनलाईन बुकिंग बंधनकारक

Vice President Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती पदाबाबतचा निर्णय, पंतप्रधान मोदी अन् जे.पी.नड्डा घेणार; 'NDA' बैठकीत ठराव

Latest Maharashtra News Updates: वडील रागावल्यामुळे मुलाने केली आत्महत्या, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT