कोकण

काजिर्डा धबधबा परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास

CD

-rat६p१२.jpg, rat६p१३.jpg-
२५N८२५१५
राजापूर ः पावसाळ्यामध्ये प्रवाहित असलेला काजिर्डा धबधबा.
-------
काजिर्डा धबधबा परिसराचा होणार विकास
पाच कोटीचा आराखडा सादर ; १२०० फूट उंच
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः तालुक्यातील जामदा खोरे परिसरातील काजिर्डा धबधबा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे पाच कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला आहे.
कोल्हापूर घाटमाथ्यावरून वाहत येणाऱ्‍या जामदा नदीवरील हा धबधबा काजिर्डा येथे कोसळतो. सुमारे बाराशे फुटावरून बारमाही कोसळणारा हा धबधबा तीन टप्प्यामध्ये कोसळतो. धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी वाकड्यातिकड्या पायवाटेची सुमारे दोन तासाची पायपीट करावी लागते. सह्याद्रीच्या कुशीतून कोसळणाऱ्‍या धबधब्याच्या ठिकाणी जाताना गड चढण्याचा अनुभव येतो. धबधब्याच्या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये जनावरे चारण्यासाठी नेणाऱ्‍या गुराख्यांचाही वावर असतो. शेतासह काबाडकष्ट करणाऱ्‍या गावातील जा-ये करणाऱ्‍या लोकांची भेट होते. धबधब्याच्या पायथ्याशी लोकवस्ती आहे. त्यामुळे या साऱ्‍या भ्रमंतीमध्ये पर्यटकांनी ग्रामजीवनही जवळून पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळते. अशा वैशिष्ट्यपूर्ण धबधबा आणि परिसराला पर्यटनस्थळ म्हणून मंजुरी मिळताना या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, अशी मागणी काजिर्डा येथील ग्रामस्थ प्रकाश पाटील, सुधाकर आर्डे, डॉ. प्रसाद पाटील, अमोल आर्डे, गणेश आर्डे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत त्यांनी काजिर्डा धबधबा पर्यटनस्थळ विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या. त्यानुसार बांधकाम विभागाने सुमारे पाच कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. त्यामध्ये धबधब्याकडे जाण्यासाठी चांगल्या रस्त्यासह पर्यटकांसाठी आवश्यक प्राथमिक सुविधांचा समावेश आहे.

चौकट
इथे आहे काजिर्डा धबधबा
राजापूरहून मुंबईकडे जाताना १३ किमीवर उजव्या बाजूला पाचल रस्ता लागतो. तेथून २१ किमीवर पाचल गावातून उजव्या बाजूला जवळेथर रस्ता. या रस्त्यापासून सुमारे ६ किमीवर मुरांबा येथून डाव्या बाजूला रस्ता जातो. तेथून ७ किमीवर काजिर्डा गाव आहे. काजिर्डा गावातून धबधब्याच्या येथे सुमारे दोन किमीची पायपीट करून जाता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Gold Village: सोन्याचा पाऊस पडणारं गाव! महाराष्ट्रातील 'या सोनेरी गावाची' कहाणी तुम्ही ऐकलीये का?

Male News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! शनिवारपासून अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली पर्यटकांसाठी खुली, ऑनलाईन बुकिंग बंधनकारक

Vice President Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती पदाबाबतचा निर्णय, पंतप्रधान मोदी अन् जे.पी.नड्डा घेणार; 'NDA' बैठकीत ठराव

Latest Maharashtra News Updates: वडील रागावल्यामुळे मुलाने केली आत्महत्या, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT