कोकण

सावंतवाडीत गजानन नाटेकरांचा सत्कार

CD

82578

सावंतवाडीत गजानन नाटेकरांचा सत्कार
सावंतवाडी ः संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल गजानन नाटेकर यांचा माजी शिक्षण मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नाटेकर यांनी आपल्या कार्यकाळात ९५ टक्के प्रस्तावांना सकारात्मक मंजुरी देऊन ही योजना गरजूंपर्यंत प्रभावीपणे पोहोचविली, असे गौरवोद्गार श्री. केसरकर यांनी काढले. येथे आयोजित ''महसूल सप्ताह व छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. श्री. नाटेकर हे केसरकर यांच्या कार्यालयाचे कामकाजही सांभाळतात. या कार्यक्रमाला प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. नीता कविटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
..................
82579

परुळे चिपीतील संरक्षक भिंत कोसळली
म्हापण ः गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे परुळे चिपी कालवंडवाडी येथील रहिवासी भास्कर लक्ष्मण पवार यांच्या घरासमोरील चिरेबंदी बांधलेली संरक्षक भिंत सुमारे वीस फूट खाली कोसळून नुकसान झाले. गेले दोन दिवस परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. चार दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने परिसरात मुसळधार हजेरी लावली. यामुळे ही घटना घडली. याची माहिती मिळताच चिपी पोलिसपाटील संदेश पवार यांनी घटनास्थळी पाहाणी करत माहिती घेतली व नुकसानीची खबर तत्काळ प्रशासनाला देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Damage in Sangli : सांगली जिल्ह्यातील पिकांचा पंचनामा पूर्ण, शेतकरी ३ वर्षे मागे पडतील, ५१ हजार हेक्टर शेती बाधित

Koyna Earthquake: किल्लारी भूकंपाच्या ३२ वर्षांच्या आठवणी अन् कोयनेत पहाटे भूकंपाचा धक्का; नागरिकांचा थरकाप

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांना सर्वसमावेशक मदत देण्याचा प्रयत्न असेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Quetta Bomb Blast : बलुचिस्तानची राजधानी क्वेटा रक्तरंजित स्फोटाने हादरली; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, आत्मघाती हल्ल्याचा संशय?

Kolhapur Crime News : सासरवाडीहून घरी येताना वाटेत पत्नीचा खून; रस्त्यावरच हातोडा अन् कोयत्याने केले वार

SCROLL FOR NEXT