श्वान, सर्प, विंचूदंशाने ४६ हजार बाधित
जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षांतील स्थिती; संख्येत वाढ, एकाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत श्वान, सर्प आणि विंचूदंशाचे तब्बल ४६ हजार प्रकार नोंदले गेले आहेत. त्यामध्ये दुर्दैवाने १ व्यक्ती श्वानदंशाने दगावली. जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये या प्रकारांची नोंद झाली आहे.
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्यकेंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ५ वर्षात सर्प, विंचू आणि श्वानदंश झालेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. २०२० मध्ये श्वानदंशाचे ४ हजार ६२७ जण रुग्ण आहेत. त्यामध्ये यावर्षी १ जण दगावला आहे. २०२२ मध्ये ४ हजार ३११, २०२३ मध्ये ३ हजार ४५ आणि गतवर्षी २०२४ मध्ये २ हजार १६५ असे ५ वर्षात १८ हजार ३१७ व्यक्तींना श्वानदंश झाल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात सर्रास विंचूदंशाचे प्रमान अधिक असते. त्यानुसार ५ वर्षांत तब्बल २३ हजार ३९४ व्यक्तींना विंचूदंश झाला. २०२० मध्ये ६ हजार ५०९, २०२१ मध्ये ६ हजार ८५७, २०२२ मध्ये ४ हजार १४८, २०२३ मध्ये ३ हजार ९६३, २०२४ मध्ये २ हजार ९१७ जणांना विंचूदंश झाला.
जिल्ह्यात ५ वर्षांत सर्पदंशामुळे सुमारे ४ हजार ३६६ व्यक्तींना उपचार घ्यावे लागले. २०२०चा विचार करता ९१९, २०२१ मध्ये १ हजार १९०, २०२२ मध्ये १ हजार ६२, २०२३ मध्ये ७०९ आणि २०२४ मध्ये ४८६ असे ४३६६ व्यक्तींना सर्पदंश झाला. ही आकडेवारी ग्रामीण भागातील आहे. जिल्हा रुग्णालयातील आकड्यांचा तपशील अधिक असेल. ही एकूण आकडेवारी ४६ हजार ७७ इतकी आहे. सर्प, विंचू आणि श्वानदंश झालेल्या व्यक्तींवरती उपचार करण्यासाठी त्या त्या प्रकारची लस (इंजेक्शन) आवश्यक असतात. ती सध्या बेताचीच आहेत. त्यांचा पुरेसा पुरवठा शासनाने करावा, अशी मागणी नेहमीच होत असते.
---
सर्पदंशाचे प्रमाण
वर्ष* संख्या
२०२०* ९१९
२०२१* १,१९०
२०२२* १,०६२
२०२३* ७०९
२०२४* ४८६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.