कोकण

महिलांना सक्षम बनविण्याचा संकल्प

CD

-rat९p६.jpg-
२५N८३२२९
दापोली ः राणी लक्ष्मीबाई प्रभागसंघाला धनादेश प्रदान करताना राज्यमंत्री योगेश कदम.
----
महिलांना सक्षम बनवण्याचा संकल्प
योगेश कदम ः हर्णैमध्ये एक कोटी निधीचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ९ ः उमेदच्या माध्यमातून महिलांना पाठबळ देऊन सक्षम आणि लखपती बनवण्याचा माझा संकल्प आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
हर्णै ग्रामपंचायत येथे समुदाय निधी वितरण सोहळा झाला. या प्रसंगी १ कोटी रुपयांचा समुदाय निधी बचतगटांना वितरित करण्यात आला. यामध्ये जालगावच्या राणी लक्ष्मीबाई प्रभागसंघाला ७० लाख रुपये आणि हर्णै संघर्ष प्रभागसंघाला ३० लाखाचा धनादेश देण्यात आला. या प्रसंगी राज्यमंत्री कदम म्हणाले, येणाऱ्या काळात महिला बचतगट आणि उद्योग यांच्यात करार करून महिलांना अधिक बळ देण्यात येईल. प्रत्येक महिला लखपती करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. बचतगटातील महिलांनी मंत्री कदम यांना राखी बांधून औक्षण केले. या वेळी सरपंच ऐश्वर्या धाडवे, उमेद जिल्हा प्रकल्प अधिकारी विजयसिंह जाधव, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती भगवान घाडगे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फिलिपिन्समध्ये भूकंपाने विध्वंस! इमारती कोसळल्या, ६० जणांचा मृत्यू; धक्कादायक VIDEO VIRAL

Gold-Silver Price Today: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव वाढले; तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सोने बाजाराला झळाळी

Men Infertility Reasons: 'या' 3 सवयी ठरतात पुरुषांमधील इनफर्टिलिटीचे मुख्य कारण, आजपासूनच लाइफस्टाइलमध्ये करा बदल

Maruti Suzuki S-Presso: फक्त 1,999 रुपये EMI; कंपनीची ऑफर, विकल्या 80 हजार गाड्या

SCROLL FOR NEXT