कोकण

रक्षाबंधनमधून जीजीपीएस गुरुकुलचा अनोखा सोहळा

CD

-rat१०p३४.jpg-
२५N८३४६०
रत्नागिरी : जीजीपीएसच्या बाबुराव जोशी गुरुकुलमधील विद्यार्थिनींनी जावडे येथील आश्रमशाळेस रक्षाबंधन साजरे केले. भावांना शैक्षणिक भेट दिली. सोबत संस्थापक संतोष कांबळे.
----
रक्षाबंधनामधून ‘जीजीपीएस’ गुरुकुलचा अनोखा सोहळा
आश्रमशाळेला शालेय साहित्य, कपड्यांची भेट ; जपली सामाजिक बांधिलकी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधून जीजीपीएस प्रशालेच्या (कै.) बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थिनींनी हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित जावडे येथील आश्रमशाळेस भेट दिली. त्यांनी रक्षाबंधनचा सण संस्मरणीय केला. निवासी शाळेत राहून शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी विद्यार्थिनींनी खाऊ, शैक्षणिक साहित्य, कपडे अशा विविध भेटवस्तू मनापासून दिल्या.
साहित्य देताना मुलींच्या डोळ्यांत उत्साह आणि समाधान दिसत होते, तर भेट मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतज्ञतेची भावना होती. गुरुकुलच्या विद्यार्थिनींनी आश्रमशाळेतील सर्व मुलांना राखी बांधून त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. परस्पर प्रेम, विश्वास आणि बांधिलकीचे प्रतीक असलेल्या या सोहळ्यात मुलांनीही बहिणींचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या विशेष क्षणात मुला–मुलींमध्ये भावनिक बंध तयार झाला. गुरुकुलच्या विद्यार्थिनींनी शाळेच्या परिसराची पाहणी केली, वर्गखोल्यांमधील वातावरण अनुभवले आणि विद्यार्थ्यांचा दिवस कसा जातो, अभ्यासपद्धती याची माहिती घेताना त्यांच्या अडचणी व स्वप्नांविषयी जवळून संवाद साधला. जावडे शाळेचे संस्थापक संतोष कांबळे, मुख्याध्यापक व शिक्षकांनी गुरुकुल गटाचे आभार मानले. गुरुकुल विभाग प्रमुख वासुदेव परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली, जी. जी. पी. एस.च्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर व र. ए. सोसायटीचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने पार पडला.

चौकट १
समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता
नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शहरातील भाट्ये समुद्रकिनारी जाऊन समुद्राला नारळ अर्पण केला. सागर किनाऱ्याची स्वच्छताही केली. विद्यार्थिनींनी रत्नागिरी बसस्थानक, नगरपालिका, रत्नागिरी पोलीस स्थानक या ठिकाणी जाऊन रक्षाबंधन साजरे केले.
--------
कोट
अशा भेटी फक्त मदत देत नाहीत, तर मुलांच्या मनात ‘आपल्यासाठी कोणीतरी आहे’ ही भावना जागवतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शिकण्याची प्रेरणा दुपटीने मिळते.
- संतोष कांबळे, संस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabutarkhana: ...तर आम्ही शस्त्रही उचलू; जैन समाजाच्या मुनींची थेट धमकी, कबुतरखान्यांवरील बंदीचा वाद चिघळला

Devendra Fadnavis: 'ओबीसी समाज दुरावल्याने यात्रेची आठवण'; मंडल यात्रेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Manoj Jarange: मुंबईत आंदोलन करणारच : मनोज जरांगे; 'मराठा नेत्यांना भाजपमध्ये त्रास'

MP Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांनाही ‘ते’ दोघे भेटले: खासदार संजय राऊतांचा दावा; शरद पवारांच्या दाव्याचे समर्थन

Deputy Chief Minister: शिवसेना आपल्या पाठीशी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; श्रीनगरमध्ये घोडेवाल्याच्या कुटुंबीयांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT