कोकण

आरोग्य शिबीरात ७० रुग्णांची तपासणी

CD

- rat११p१.jpg-
P२५N८३६२६
रत्नागिरी ः तालुक्यातील वरवडे येथे आरोग्य शिबिरात दीपप्रज्वलन करताना इनरव्हील क्लब ऋचा गांधी सोबत अन्य मान्यवर.

आरोग्य शिबिरात ७० रुग्णांची तपासणी
वरवडेत आयोजन; विविध रुग्णालयांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय व वरवडे येथील श्री चंडिकादेवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था (एफएफपीओ), रोटरी क्लब मिडटाउन, जिल्हा शासकीय रुग्णालय, नंदादीप आय हॉस्पिटल, रामनाथ हॉस्पिटल आणि जलजीविका, पुणे यांच्या सहकार्याने तालुक्यातील वरवडे येथे सर्वाइकल, ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शन, नेत्र आणि मोतीबिंदू तपासणी तसेच रक्त तपासणी करून मोफत आरोग्य शिबिर उत्साहात झाले.
या शिबिरात ईसीजी, मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सर, नेत्रतपासणी करण्यात आली. सुमारे ७० रुग्णांनी याचा फायदा घेतला. याच शिबिरात जिल्हा रुग्णालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीबद्दल माहिती देण्यात आली. गांधी डिस्ट्रिब्युटरतर्फे औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. या वेळी मत्स्य महाविद्यालयाचे डॉ. सुहास वासावे, डॉ. संदेश पाटील, भालचंद्र नाईक, चिन्मय दामले, डॉ. मोहिते, डॉ. भायजे आणि कर्मचारी उपस्थित होते. शिबिराचे उद्‍घाटन वरवडे गावचे उपसरपंच गजानन हेदवकर यांच्या हस्ते आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, प्रमुख अन्वेषक डॉ. सुहास वासावे यांच्या उपस्थितीत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Results : दहा हजार रूपयांच्या योजनेमुळे बिहारमध्ये एनडीए सत्तेत, निवडणूक आयोगाने विचार करावा; शरद पवार यांची प्रतिक्रिया

Maharashtra Weather: महाराष्ट्र थंडीने कुडकुडणार! मुंबईसह 'या' जिल्ह्यांत गार वारे वाहणार; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

Video: शिवाजी महाराजांनी पुण्यात शाहिस्तेखानावर कसा केला होता सर्जिकल स्ट्राईक? AI LIVE रिपोर्टींग व्हायरल, शिवभक्त असाल तर नक्की पाहा

Nanded Cold Wave: थंडी वाढताच उबदार कपड्यांना मागणी; हिंगोली गेट भागातील तिबेटियन मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी

Nashik News : नाशिकमध्ये गौणखनिज माफियांनी घातला हैदोस; तपासणीसाठी थांबवणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न!

SCROLL FOR NEXT