कोकण

जिल्ह्यात उद्योजक घडविणार

CD

83720


सिंधुदुर्गात उद्योजक घडविणार

गजानन कांदळगावकर ः जिल्ह्यात ‘फ्युचरप्रेन्युअर्स’ अभिनव उपक्रम


सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः वर्तमान काळातील स्पर्धात्मक आणि सतत बदलणाऱ्या उद्योगक्षेत्रात नवनवीन कल्पना, नैसर्गिक साधनसंपत्ती व शाश्वत विकास आणि नैतिक व्यावसायिक मूल्ये आत्मसात करून तरुण पिढीला उद्योजकतेकडे प्रवृत्त करण्यासाठी आकार फाउंडेशन आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भविष्यातील उद्योजक घडविण्याचा ‘फ्युचरप्रेन्युअर्स’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती आकार फाउंडेशनचे गजानन कांदळगावकर, रोटरी असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज येथील संत राऊळ महाराज कॉलेज येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी संत राऊळ महाराज महाविद्यालय प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव पवार, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, आकार फाउंडेशनचे गजानन कांदळगावकर, एमआयडीसी असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीन पावसकर, सचिव ॲड. नकुल पार्सेकर, जिल्हा व्यापारी महासंघ उपाध्यक्ष नितीन तायशेटये, संस्था सदस्य महेंद्र गवस, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अभिजित परब, प्रमोद भोगटे, नीता गोवेकर, आनंद वेंगुर्लेकर, प्रशांत केरवडेकर, गीताश्री ठाकूर, सुवर्णा निकम आदी उपस्थित होते.
कांदळगावकर म्हणाले, ‘‘हा उपक्रम नवोन्मेष, शाश्वतता, नैतिकता, सर्वसमावेशकता आणि मार्गदर्शन या पाच मूलभूत स्तंभांवर आधारित आहे. हा केवळ स्पर्धा कार्यक्रम नसून, ग्रामीण व शहरी तरुणाईला स्वावलंबी, सक्षम आणि सामाजिक दृष्ट्या जबाबदार उद्योजक बनविण्याचा एक ठोस प्रयत्न आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एमआयडीसी असोसिएशन कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांनी विशेष सहकार्य केले आहे. सिंधुदुर्गात व्यवसाय करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये खूप ऊर्जा आणि कल्पना आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये ही स्पर्धा महाविद्यालीन विद्यार्थी गट आणि खुला गट अशा दोन गटांमध्ये घेण्यात येईल. यासाठी भव्य बक्षिसे आणि मोठ्या बँका व पतसंस्था यांच्या माध्यमातून विजेत्यांना सहकार्य करण्यात येणार आहे. बँकरकडून (चॅनल पार्टनर) वित्तीय मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येणार आहे.’’
......................
पाच जणांची निवड
‘फ्युचरप्रेन्युअर्स’ कार्यशाळेत निवड झालेले राऊळ महाराज महाविद्यालयाचे विद्यार्थी अनुक्रमे असे ः हर्षदा शिर्के (तृतीय वर्ष आयटी), पूर्वा मिसाळ (प्रथम वर्ष बीएमएस), तनिषा मालवणकर (तृतीय वर्ष बीएएफ), संकेत कुलकर्णी (प्रथम वर्ष बीएमएस), राखी सामंत (द्वितीय वर्ष बीएडएफ).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार! कधी अन् कुठे, IMDने तारीखच सांगितली

Zomato delivery boy accident: झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात पडला उघड्या गटारात अन् मग...

मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेचे काम अंतिम टप्प्यात, प्रवासात पाच तासांची बचत; कधीपासून होणार वाहतूक सुरु?

Mhada House: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाचे घर होणार आणखी स्वस्त, किती टक्क्यांनी घटणार; वाचा अहवाल

PM Modi and Zelenskyy : मोठी बातमी! आता मोदी अन् झेलेन्स्कींचीही झाली चर्चा; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT