कोकण

वाळू उपसा थांबवा; अन्यथा आत्मदहन वाळू उपसा थांबवा; अन्यथा आत्मदहन

CD

83768

वाळू उपसा थांबवा; अन्यथा आत्मदहन

तळाशीलच्या ग्रामस्थांचा इशारा; मालवणात तहसीलदारांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : कालावल खाडीपात्रात तळाशील रेवंडी येथे अनधिकृतरित्या सुरू असलेल्या वाळू उपशावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने संतप्त बनलेल्या ग्रामस्थांनी तळाशील ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर यांच्या नेतृत्वाखाली आज येथील तहसील कार्यालयात धडक दिली. येत्या १५ ऑगस्टपर्यंत अनधिकृत वाळू उपसा बंद न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील. यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास आत्मदहन करू, असा इशारा तळाशील ग्रामस्थांनी यावेळी दिला.
यावेळी झालेल्या चर्चेत प्रांत ऐश्वर्या काळुशे यांनी, ज्या ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे, तेथे महसूल, पोलिस आणि बंदर विभागाचे संयुक्त पथक कार्यरत ठेवत कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. तसेच कालावल खाडीकिनारी परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत, त्यांची त्वरित तपासणी करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले.
जिल्ह्यात ९ जूनपासून वाळू उपसा बंद केला आहे, तरीही कालावल खाडीपात्रात तळाशील रेवंडी येथे पाच ते दहा होड्यांद्वारे अनधिकृतरित्या दिवस-रात्र वाळू उपसा केला जात आहे. या संदर्भात वारंवार प्रशासनाचे निवेदन देत लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त बनलेल्या तळाशील ग्रामस्थांनी आज येथील तहसील कार्यालयात धडक दिली. यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार वर्षा झालटे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश माने, तळाशील ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर, केशर जुवाटकर, जान्हवी पराडकर, मंगल केळुसकर, स्नेहा कांदळगावकर, समीना केळुसकर, श्रीकृष्ण कांदळगावकर, पुंडलिक जुवाटकर, रवी कोचरेकर, गणपत शेलटकर, सचिन तारी, नंदकुमार कोचरेकर आदी उपस्थित होते.
---
रेवंडी येथे अनधिकृत वाळू उपसा
तोंडवळीमध्ये कालावल खाडीपात्रात, तळाशीलवाडी समोर रेवंडी येथे अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे. तळाशील कालावल खाडीपात्रात नांगर, दोऱ्या व काठ्या रोवून ठेवल्या आहेत. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना मासेमारी करताना अडथळा निर्माण होत आहे. हा वाळू उपसा हरित न्यायालयाची बंदी असलेल्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे एक प्रकारे न्यायालयाचाही अवमान होत आहे. याबाबत अनेकदा प्रशासनास निवेदन देऊन तसेच आंदोलन छेडून देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. अनधिकृत वाळू उपसा प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहे का, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला. दररोज सुमारे ८० हून अधिक डंपरमधून वाळूची वाहतूक होत असून, याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधित नौका पकडून जप्त कराव्यात किंवा नष्ट कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
---------
दीडशेहून अधिक परप्रांतीय कामगार कसे?
कालावल खाडीकिनारी सुमारे दीडशेहून अधिक परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत. वाळू उपसा बंद असतानाही हे कामगार अद्यापही या ठिकाणी वास्तव्य करून का आहेत? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला. यावर प्रांताधिकारी काळुशे यांनी पोलिस प्रशासनाला त्वरित या कामगारांची तपासणी करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. संबंधित ग्रामपंचायत सरपंच, तलाठी यांना नोटिसा काढण्याचे आदेशही प्रशासनास दिले. या चर्चेनंतर तळाशील ग्रामस्थांनी १५ ऑगस्टला आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून, जोपर्यंत लेखी आश्वासन आणि कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. याची गांभीर्याने दखल घेतली न गेल्यास प्रसंगी आत्मदहन करू, असा इशारा दिला. याबाबतचे निवेदन खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांना सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nivrutti Maharaj Indurikar Statement Video : इंदुरीकर महाराजांचं भर किर्तनातच टीकाकारांना चॅलेंज म्हणाले, ‘मुलीचं लग्न याहीपेक्षा टोलेजंग करणार, बघू..’’

Anna Hazare : राळेगणसिद्धी- केंद्राची पाहणी करताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर समावेत आण्णा हजारे; डॉ. बापूसाहेब नागरगोजे!

Latest Marathi Live News Update: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

Pandharpur News : पंढरपूर सायकलर्स क्लबचे सदस्य पॅरा कमांडो समाधान थोरात वर्ल्ड हाफ आयर्नमॅन चॅम्पियनशिपसाठी पात्र

Junnar Leopard Attack : वडगाव आनंद या ठिकाणी एका तरूणावर बिबटयाने हल्ला करून केले जखमी!

SCROLL FOR NEXT