rat१२p७.jpg-
२५N८३८५३
रत्नागिरी : शिवाज्ञा पवार
ईगल तायक्वांदोच्या
शिवाज्ञा पवारला रौप्य
रत्नागिरी, ता. १२ : चिपळूण येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत अभ्युदयनगर येथील ईगल तायक्वांदो सेंटरच्या शिवाज्ञा पवार हिला रौप्यपदक मिळाले. शहानूर चिपळूण तालुका तायक्वांदो अॅकॅडमी आयोजित रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या संलग्नतेने चिपळूणच्या पुष्कर हॉलमध्ये स्पर्धा झाली. या स्पर्धेत १४ किलो वजनी गटाखालील मुलींच्या पीवी गटात शिवाज्ञा पवारला रौप्यपदक मिळाले. प्रशिक्षक संकेता सावंत आणि सई सावंत यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली तिने हे यश मिळवले. दामले शाळेची विद्यार्थिनी असलेल्या शिवाज्ञाचे अभिनंदन चाळकेवाडी, टिके येथील ग्रामस्थ तसेच शाळा, तायक्वांदो संघटनेने केले.