- rat१२p३.jpg -
२५N८३८४९
विष्णू मंदिरातील मूर्ती
---
बुरंबाड येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १२ ः संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथे खालचा वठार येथे श्री देव विष्णू मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी उत्सवाचे १५१वे वर्ष आहे. गतवर्षी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला होता.
श्रावण कृष्ण षष्ठी ते श्रावण कृष्ण अष्टमी असा १४ ते १६ ऑगस्टदरम्यान उत्सव साजरा होणार आहे. यामध्ये १४ व १५ रोजी सकाळी पवमानाभिषेक पूजा, रात्री आरती मंत्रपुष्प झाल्यावर श्रींचा छबिना निघणार आहे. त्यानंतर कीर्तन होईल तर १६ रोजी सकाळी ८वा. श्रींची पवमानाभिषेक पूजा, सकाळी दहीकाल्याचे कीर्तन, विविध खेळ, हंडी फोडणे, नवसपूर्ती, दहीकाला व महाप्रसाद होईल. रात्री आरती व त्यानंतर स्थानिक कलाकारांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम अर्थात ‘अशा रंगल्या रात्री’ हा कार्यक्रम होणार आहे तर उत्तररात्री लळिताचे कीर्तन होईल. या वेळी कीर्तनसेवेला पुण्याचे ज्ञानेशबुवा धानोरकर (जोशी) असणार आहेत. जन्माष्टमीच्या होणाऱ्या या उत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन न्यासाचे अध्यक्ष लक्ष्मण साठे व सचिव विकास जाधव यांनी केले आहे.