कोकण

बक्षीस योजना म्हणजे ईश्वराचा प्रसाद

CD

83972

बक्षीस योजना म्हणजे ईश्वराचा प्रसाद

अशोक येजरे ः साळगावात प्रभूतेंडोलकर कुटुंबीयांतर्फे गुणगौरव

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी प्रभूतेंडोलकर कुटुंबीयांमार्फत अव्याहत चालू असलेल्या या बक्षीस योजनेमार्फत मिळालेली कौतुकाची थाप हा पांडुरंगाच्या वारीतील प्रसाद समजून पुढील वाटचाल करा, असा मौलिक कानमंत्र बॅ. नाथ पै विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अशोक येजरे यांनी दिला. शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव येथे आयोजित अच्युत रघुनाथ प्रभुतेंडोलकर स्मरणार्थ बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या योजनेचे दाते व झाराप येथील उद्योजक दिलीप प्रभुतेंडोलकर, संस्थेचे अध्यक्ष मुकुंद धुरी, संस्था सचिव प्रदीप प्रभुतेंडोलकर, संस्था उपाध्यक्ष भास्कर परब, संस्था संचालक सतीश साळगावकर, ज्ञानदेव चव्हाण, निवृत्त पोलिस अधिकारी श्री. डिचोलकर, मुख्याध्यापक सलीम तकीलदार, कॉलेजचे प्राचार्य सचिन पाटकर, हंसराज सावंत, पालक सावळाराम माणगावकर, रोशन प्रभू, श्री. कोलार, अनिता हळदणकर, सानिका हळदणकर आदी उपस्थित होते.
येजरे यांनी विद्यार्थ्यांना विविध दाखले देत मार्गदर्शन केले. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली असून ही बक्षीस योजना तुम्हाला जगण्याचे सामर्थ्य देईल, असे सांगितले. प्रभूतेंडुलकर कुटुंबियांमार्फत चालविलेली ही बक्षीस योजना जिल्ह्यातील एक नावीन्यपूर्ण योजना असून या योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन केले. संस्था सचिव श्री. प्रभूतेंडोलकर यांनी, आजचे युग स्पर्धेचे आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. हा संघर्ष करत असताना संघर्षशील व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. समाजामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले पाहिजे. आपल्या यशामधील योगदान दिलेल्यांना नेहमीच स्मरणात ठेवा, असे सांगितले. निधी सावंत, दुर्वा धुरी यांनी योजनेचे कौतुक केले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पाचवी ते बारावीपर्यंत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविले. मुख्याध्यापक तकीलदार यांनी परिचय केला. सहाय्यक शिक्षक एकनाथ कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ बागेवाडी यांनी बक्षिसांचे वाचन केले. विद्यानंद पिळणकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुंड पाळू नका, दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने रहा; खोटं काम....; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

Dhananjay Munde: काही जणांना आता ओबीसीतून आरक्षण हवं पण... धनंजय मुंडे पहिल्यांदा आरक्षणावर बोलले, भगवानगडावर वादळी भाषण

Dussehra Melava 2025 Live Update: मराठ्यांनी प्रशासनात ताकद वाढवावी- जरांगे पाटील

Kolhapur Shahi Dussehra : शाही दसरा सोहळा, अडीचशे वर्षांची परंपरा; हत्तींची जागा घेतली मेबॅक मोटारीने, छत्रपतींची अगवाणी पोलिस दलाकडून

Nashik News : 'पिवळं सोनं' महागलं! दसऱ्यासाठी गोदाघाटावर झेंडू फुलांची मोठी आवक, किलोला दीडशे रुपये दर

SCROLL FOR NEXT