कोकण

कणकवली, सावंतवाडीत लवकरच नवीन शाखा

CD

83977

कणकवली, सावंतवाडीमध्ये
लवकरच शाखा ः चव्हाण

कुडाळात निवृत्त कर्मचारी संस्थेची सभा

कुडाळ, ता. १२ ः निवृत्त व कार्यरत कर्मचारी सहकारी पतसंस्थेची व्याप्ती ही जिल्हा पातळीवर असल्यामुळे प्रत्येक तालुक्यात सभासद वाढवण्यावर भर द्यावा. लवकरच कणकवली व सावंतवाडी येथे संस्थेची शाखा सुरू करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष श्रीराम चव्हाण यांनी केले.
निवृत्त व कार्यरत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग या संस्थेची पाचवी वार्षिक अधिमंडळ सर्वसाधारण सभा येथील महालक्ष्मी हॉल क्र. २ येथे आयोजित करण्यात आली. उद्‍घाटन अध्यक्ष श्री. चव्हाण यांच्या हस्ते संचालक सभासदांच्या उपस्थितीत झाले. उपाध्यक्ष सखाराम सपकाळ, संचालक चंद्रकांत परब, अंकुश गवस, नारायण सातार्डेकर, मनोहर सरमळकर, प्रकाश साळुंखे, प्रिया आजगावकर, मंगला तेंडोलकर, मारुती शेळके, तज्ज्ञ संचालक उदय शिरोडकर, शरद नारकर, संस्था कर्मचारी व्यवस्थापक शुभम राऊळ, लिपिक अंकिता सुर्वे, पूनम सावंत आदी उपस्थित होते. यावेळी नवीन अंदाजपत्रकाबाबत चर्चा केली. दिवंगत सभासद, थोर व्यक्ती व शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहिली. यशवंतराव चव्हाण सहकार प्रशिक्षण केंद्राचे (कराड) अजित शिंदे यांनी मार्गदर्शन केले. श्रुती वारंग, साईप्रसाद रेडकर, अनिकेत गवस, हर्षद शेठ, प्राजक्ता गव्हाणकर या सभासद पाल्यांचा गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT