कोकण

बीएसएनएल सेवा नेतर्डेत अखेर सुरू

CD

बीएसएनएल सेवा
नेतर्डेत अखेर सुरू
बांदा, ता. १२ ः वर्षभराच्या मागणीनंतर अखेर नेतर्डे गावामध्ये बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरू झाली आहे. या सेवेमुळे येथील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या आदेशाने त्वरित सेवा सुरू झाल्याबद्दल माजी सभापती प्रमोद कामत यांनी त्यांचे विशेष आभार मानले. नेतर्डेत वर्षभरापूर्वी बीएसएनएल ​टॉवर उभारला. मात्र, नेटवर्कची समस्या कायम होती. पालकमंत्री राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. गावामध्ये मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रशासकीय कामे, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण आणि इतर दळणवळणाच्या कामांमध्ये यामुळे मोठा अडथळा येत होता.​ या मागणीची दखल घेत पालकमंत्री राणे यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नेतर्डे गावातील टॉवरची रेंज प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे काम लवकर पूर्ण झाले, असे कामत यांनी सांगितले. बीएसएनएल सेवा सुरू झाल्यामुळे गावातील दळणवळण सुलभ झाले आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी पालकमंत्री राणे यांचे आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav criticizing Tejashwi Yadav : ‘’...म्हणूनच तेजस्वी आज ‘फेलस्वी’ झाला’’, तेजप्रताप यादवांचं मोठं विधान; मोदी अन् नितीश कुमारांचं कौतुकही केलं!

Latest Live Update News Marathi: दादरमधील सेना भवनात बेस्ट कर्मचारी सेनेचा मेळावा

Gold-Silver Rate: उत्तराखंडमध्ये सोन्याचे भाव घसरले; कारण काय? इतर राज्यांमध्ये सोनं कसं असेल?

Bihar Election Result 2025 Live Updates : बिहार विधानसभेतील या जागांचे निकाल आले, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Winter Travel: थंडीच्या सुट्ट्या पडताच ट्रिप प्लॅन करताय? मग काश्मिर, कुलू-मनाली विसरा; महाराष्ट्रातील ‘ही’ ठिकाणं आहेत खरे आकर्षण!

SCROLL FOR NEXT