कोकण

''वृक्षाबंधना''तून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

CD

84180

‘वृक्षाबंधना’तून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
साळगावात अनोखे रक्षाबंधनः जय हिंद कॉलेजच्या उपक्रमाचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ः साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्सतर्फे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. ‘वृक्ष संवर्धन व जतन’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात हॉटेल मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रत्येकाने झाडाला राखी बांधली आणि ‘हे झाड मी जतन व संवर्धन करणार’, अशी शपथ घेतली.
जवळपास १५० विद्यार्थ्यांनी हा संकल्प स्वीकारला असून, त्यांनी आजपासून त्या झाडाची निगा राखण्याची जबाबदारी घेतली आहे. यामुळे केवळ वृक्ष लागवड नव्हे, तर वृक्षांचे दीर्घकालीन संवर्धन व जतन किती महत्त्वाचे आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत यांनी मार्गदर्शन केले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्ष संवर्धनासाठी उपाययोजना करून वृक्षतोडीवर बंदी घातली. त्यांच्या विचारांप्रमाणे आजच्या तरुणांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसोबतच नैसर्गिक साधनसंपत्तीचेही ज्ञान घेऊन प्रगल्भ व्हायला हवे. आपण किमान एक झाड जतन केल्यास त्यातून नवी ऊर्जा मिळेल आणि जीवन सुखकर होईल, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे सीनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभूकेळुसकर यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. कोकणात नैसर्गिक संपत्ती विपुल आहे. जय हिंद कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थी एक झाड जतन करेल, हा संकल्प स्तुत्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा व्यावहारिक धडा मिळेल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले.
बी.एड्. कॉलेजचे प्राचार्य डॉ. मयुर शारबिद्रे यांनी, वृक्षतोडीमुळे वन्यजीव वस्तीत येण्याच्या समस्येवर भाष्य केले व खाद्य पुरवणाऱ्या वृक्षांच्या लागवडीचे महत्त्व सांगितले. प्रा. अमेय महाजन यांनी, सूत्रसंचालन हर्षद धुरी यांनी केले. आभार मनाली सावंत यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 'सातारा जिल्ह्यातील आशिष महांगरे बनला संशाेधक'; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी, जर्मनीत करणार संशोधन

Pune : जिम ट्रेनर तरुणीने दुकानाच्या दारातच केली तरुणाची हत्या, घटनेनंतर स्वत: पोलिसात हजर; मित्रासह दोघांना अटक

Pakistan Independence Day : पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच पसरली शोककळा, हवेत गोळीबारात चिमुकलीसह ३ ठार, ६५ गंभीर जखमी

Chh. Sambhajinagar: “मैं जा रहा हूँ” असा मेसेज पाठवून २३ वर्षीय युवकाने संपवले जीवन; वाळूज एमआयडीसी परिसर हादरला

Satara News: अकरावी प्रवेशासाठी आता ‘विशेष फेरी’; मंगळवारपासून प्रवेश निश्‍चित करता येणार, सुधारित वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT