कोकण

जिल्हा विज्ञान स्पर्धेसाठी विभव राऊळ याची निवड

CD

84184

जिल्हा विज्ञान स्पर्धेसाठी
विभव राऊळ याची निवड
सावंतवाडी, ता. १३ ः सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि मदर क्विन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात ‘क्वांटम युगाची सुरुवात : संभाव्यता व आव्हाने’ या विषयास अनुसरून झालेल्या स्पर्धेत तालुक्यातील माध्यमिक शाळांमधून एकूण २० स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेत मदर क्विन्स स्कूलचा विद्यार्थी विभव राऊळ याने आपले अभ्यासपूर्ण विचार पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मदतीने प्रभावीपणे मांडले. त्याचा उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्याची निवड जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेसाठी झाली. विभव यास विज्ञान शिक्षक फरजाना मुल्ला, मिहीर राणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले, संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.
........................
84183
आजगावात स्वच्छता अभियान
आरोंदा, ता. १३ ः आजगाव येथे ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गावातील रस्ते, तिठा, वेतोबा मंदिर, रवळनाथ मंदिर परिसर, मराठी शाळा, बस शेड, बँक परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी आजगाव सरपंच यशश्री सौदागर, उपसरपंच सुशील कामटेकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम संघ पदाधिकारी, बचतगट महिला, अंगणवाडी शिक्षिका व सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आजगाव परिसर स्वच्छ केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

Credit Card Offer: लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर! कमी क्रेडिट स्कोअर असला तरीही चालेल! काय आहे ही नवी ऑफर?

Latest Marathi News Live Update : मालेगावात आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न

आजारी पत्नीवर जादूटोणा करण्याचा प्रकार उघड! 'शेतात चाललं होतं भयानक कांड'; संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर..

SCROLL FOR NEXT