swt1316.jpg
84216
सावंतवाडीः विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन करताना शुभदादेवी भोसले. व्यासपीठावर जयप्रकाश सावंत, लक्ष्मीदास ठाकूर, रामचंद्र वालावलकर, कमलाकर ठाकूर, पांडुरंग काकतकर, ॠषिकेष गावडे आदी.
विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे दर्शन
सावंतवाडीत विज्ञान मेळावाः मदर क्विन्स इंग्लिश स्कूलमध्ये उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ः राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर, शिक्षण विभाग सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि मदर क्विन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत सावंतवाडी तालुकास्तरीय स्पर्धा मंगळवारी (ता. १२) मदर क्विन्स इंग्लिश स्कूलच्या सभागृहात झाली.
कार्यक्रमाची सुरुवात सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सदस्य जयप्रकाश सावंत, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर, रामचंद्र वालावलकर, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॠषिकेष गावडे, सचिव संजय शेवाळे, बी.आर.सी. प्रतिनिधी स्नेहा गावडे, लतिका सातार्डेकर उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांच्या योग्य व्यवस्थापनातून झालेल्या या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शुभदादेवी भोसले यांचा जिल्हा विज्ञान मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. ‘क्वांटम युगाची सुरुवात : संभाव्यता व आव्हाने’ या विषयास अनुसरून झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील माध्यमिक शाळांमधून एकूण २० स्पर्धक सहभागी झाले. सर्व स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर अभ्यासपूर्ण व सखोल सादरीकरण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व चार्ट्सच्या मदतीने प्रभावीपणे केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक यशवंतराव भोसले स्कूलची अद्विता दळवी, द्वितीय विभव राऊळ (मदर क्विन्स), तृतीय क्रमांक सार्थक राऊत (आरोंदा हायस्कूल) याने पटकावला. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक काकतकर यांनी केले, सूत्रसंचालन लविना आल्मेडा यांनी केले. ॠषिकेष गावडे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा. संदीप पाटील, प्रा. प्रशांत काटे, प्रा. सोनाली येजरे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेचे तंत्रज्ञ म्हणून अमिना नाईक व दिव्या परीट यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी फरजाना मुल्ला, मिहीर राणे, योगेश चव्हाण, प्रशांत गावकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.