कोकण

संत सेना महाराज पुण्यतिथी बुधवारी

CD

श्री संत सेना महाराज
पुण्यतिथी बुधवारी
रत्नागिरी : श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त येत्या बुधवारी (ता. २०) नाभिक समाज हितवर्धक मंडळातर्फे (रत्नागिरी) येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. यामध्ये पंचामृती, आरती होईल. त्यानंतर हळदीकुंकू, भजन होईल. दहा वाजता श्री संत सेना महाराजांच्या पालखीची मिरवणूक निघेल. दुपारी १२ वाजता नाभिक समाजबांधवांचा स्नेहमेळावा होईल. या वेळी गुणवंतांचा गौरव करण्यात येईल. दुपारी महाप्रसादानंतर भजन, सायंकाळी धूपारती होऊन कार्यक्रमाचा समारोप होईल. सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाभिक समाज हितवर्धक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

चिपळूण ब्राह्मणसंघात
मंगळागौर पूजन
चिपळूण ः चिपळूणच्या ब्राह्मण साहाय्यक संघात गेली अनेक वर्षे तिसरा श्रावण मंगळवार साजरा केला. यावर्षीही संघात मंगळागौर पूजनाचे आयोजन केले होते. यावर्षी २२ सुवासिनींनी नावनोंदणी केली. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता पूजेला सुरुवात झाली. मयुरेश परांजपे यांनी पौरोहित्य केले. सायंकाळी सुमारे ५० महिलांनी मंगळागौरीचा खेळ सादर केला. त्यानंतर पुन्हा देवीची आरती केली. वृषा सोले यांनी खेळाचे नेतृत्व केले. हा सर्व कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून अध्यक्षा सुरंगा अभ्यंकर यांनी आपल्या सहकारी महिला यांच्या मदतीने खूप मेहनत घेतली तसेच संघाच्या संचालकांनी आणि सचिन चितळे, विश्वास देवधर, नाचणकर यांनी उत्तम सहकार्य केले.


विनायक राऊत यांची
जनसंपर्क कार्यालयास भेट
चिपळूण ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण दौऱ्यावर असताना पक्षाच्या नवीन चिपळूण तालुका मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हे कार्यालय उभे करण्यासाठी ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचे आभार मानले तसेच तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांचे विशेष कौतुक केले. या भेटीत राऊत यांनी चिपळूण तालुक्यातील पक्षाची संघटनात्मक ताकद, स्थानिक प्रश्न व आगामी राजकीय दिशा यावर मार्गदर्शन केले.

फाळणी दु:खद
दिनानिमित्त प्रदर्शन
रत्नागिरी ः भारताच्या फाळणीदरम्यान १४ ऑगस्ट १९४७ रोजी लाखो लोकांनी दु:ख, आघात अनुभवले. विस्थापनाचे स्मरण करण्यासाठी फाळणी दु:खद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात तत्कालीन प्रसंगाविषयीचे प्रदर्शन डिजिटल स्वरूपात करण्यात आले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हर्षलता गेडाम यांच्यासह विविध शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

रोटरी लोटेतर्फे
रानभाज्या प्रदर्शन
चिपळूण ः रोटरी क्लब लोटेतर्फे कविता विनोद सराफ हायस्कूल येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळेतील मुलांनी आपल्या आजूबाजूच्या परिसर, जंगल, डोंगरावर जाऊन श्रावणी पावसाळी भाजी आणावी, यामध्ये कर्टुले, भारंगी, शेवगा, कुडा, कोवळा, टाकळा, अळू या भाज्या घेऊन आली होती. या द्वारे विक्री कौशल्य, व्यापार, व्यवहार व व्यावसायिकता शिकायला मिळेल, या हेतूने आयोजन केले होते. बदलत चाललेली खाद्यसंस्कृती पुन्हा एकदा पूर्वीच्या काळाप्रमाणे जपता येईल. पोषक आहार मिळेल आणि ही काळाची गरज आहे, ती आपण प्रत्येकाने वाढवली पाहिजे, रुजवली पाहिजे व टिकवली पाहिजे, असे रोटरीची अध्यक्ष संदीप सुर्वे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT