कडवईमध्ये स्वातंत्र्यदिन
संगमेश्वर ः तालुक्यातील कडवई येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कडवई बाजारपेठ येथे परंपरेनुसार सार्वजनिक ध्वजवंदन करण्यात आले तसेच रिक्षा संघटनेच्यावतीने प्रभातफेरी काढण्यात आली. यावर्षी बाजारपेठ येथे सार्वजनिक ध्वजवंदन सरपंच विशाखा कुवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाईशा घोसाळकर हायस्कूल व महाराष्ट्र उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी, रिक्षा व्यावसायिक, व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
महामार्गावर २३ पासून
अवजड वाहनांना प्रवेशबंदी
चिपळूण ः गौरी गणपतीचा उत्सावासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. २३ ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी लागू करण्यात आली आहे. २३ ते २९ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. तसेच २ ते ४ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत, ६ ते ८ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत महामार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे.
-rat१६p७.jpg-
P२५N८४६७१
कुंबळे ः प्लास्टिक संकलन केंद्रांचे उद्घाटन करताना गृहराज्यमंत्री आमदार योगेश कदम, सरपंच सानिका पाटील व अन्य.
प्लास्टिक संकलन केंद्राचे कुंबळेत उद्घाटन
मंडणगड ः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पंचायत समितीतर्फे कुंबळे ग्रामपंचायत येथील तालुकास्तरीय प्लास्टिक संकलन केंद्राचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते झाले. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्लास्टिक संकलित करून संकलन केंद्रावर देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, गटविकास अधिकारी सुनील खरात, पाणीपुरवठा अधिकारी जवादे, मंडळ अधिकारी नीलेश गोडघासे, कुंबळे सरपंच सानिका पाटील उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर माऊलींची
तळवडेत जयंती साजरी
चिपळूण ः मौजे तळवडे येथे थोर संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांची ७५०वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीमध्ये सहभाग नोंदवला. हर घर तिरंगा अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट तीन दिवस ध्वजवंदन करून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांसाठी वेगवेगळे उपक्रम यामध्ये तिरंगा बाईक रॅली, श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी दिंडी काढून जयंती साजरी करण्यात आली. या वेळी तळवडे गावच्या सरपंच दूर्वा विचारे, उपसरपंच ज्योती कदम, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी पूजा गरगटे, ग्रामपंचायत कर्मचारी सुशांत साळवी, अंगणवाडी सेविका विद्या घोसाळकर, अंगणवाडी कर्मचारी मयूरी चव्हाण उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.