सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष
राजापुरात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम; युद्धकला प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः राजापुरात १९२६ साली सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
शतक महोत्सवी वाटचाल करताना राजापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उत्सवाचे पारंपरिक स्वरूप जपलेले आहे. त्यात मंगलमूर्तीची उंची, प्रत्येक वाडीचा उत्सवात सहभाग, वर्गणीसाठी फिरणारी सीलबंद दानपेटी, मूर्तिदाता सोडत, स्थानिक कलाकारांना दिलेले व्यासपीठ, विसर्जन मिरवणूक मार्गावर काढली जाणारी रांगोळी, लेझीम पथक, युद्धकला प्रात्यक्षिक आणि पालखीतून जाणारे मंगलमूर्ती अशी ही या सार्वजनिक गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत. याहीवर्षी नेहमीच्या कार्यक्रमाबरोबरच शताब्दी वर्ष असल्याने गणेशयाग व शहरवासीय तसेच गणेशभक्तांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. २६ ला सायंकाळी ४ वाजता श्रींची आगमन मिरवणूक, २७ ला सकाळी १० वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना, २८ ला सायंकाळी ५ वाजता धोपेश्वरघाटी मित्रमंडळाच्यावतीने आरती, ६ वाजता दिवटेवाडी धूतपापेश्वर प्रासादिक मंडळ यांचे भजन, २९ ला
सायंकाळी ६ वाजता हनुमानगल्ली मित्रमंडळाची आरती, ७ वा. कोंढतड महापुरूष भजन मंडळाचे भजन, रात्री ८ वा. गायक प्रशांत मेस्त्री यांचे अभंग गायन, नाट्यगीत, भक्तिगीतांची मैफील होणार आहे. ३० ला रूमडेवाडी मित्रमंडळातर्फे आरती, समर्थ महिला भजन मंडळाचे भजन, मारुती प्रसन्न भजन मंडळ आंबेवाडी येथील बुवा विजय बोळे यांचे भजन, रात्री वसुंधरा मालपेकर यांचा गीतांचा कार्यक्रम. ३१ ला महिलांचे अथर्वशीर्ष पठण संयोजक ललिता भावे, हरिहर भजनी मंडळ शिवाजीनगर यांचे भजन तर १ सप्टेंबरला श्री सत्यनारायण महापूजा, हळदीकुंकू व तीर्थप्रसाद, रात्री सुगम संगीत कार्यक्रम, २ सप्टेंबरला महिलांची आरती, रात्री गिरीश विचारे यांचे शास्त्रीय गायन, ३ ला संसारे बंधूकडून सहस्त्रावर्तन, गणेशयाग, राधेश्याम भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी पवार मंडळ दिवटेवाडी यांचे भजन, खंडेवाडी धूतपापेश्वर यांचे भजन, रात्री हरडकरांचे ढोलावरचे भजन होईल. ४ ला दुपारी श्रींची सवाद्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.