-rat१८p२.jpg-
२५N८५१६८
रत्नागिरी : गीतगायन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस फाटक हायस्कूलच्या संघाला देताना कोस्टगार्ड एअर ट्रॅफिक कंट्रोलर श्रीमती थापा, उल्हास सप्रे आदी.
---
गीतगायन स्पर्धेत फाटक हायस्कूल द्वितीय
रत्नागिरी ः नवनिर्माण हायस्कूल इंग्लिश मीडियम स्कूलमार्फत आयोजित जिल्हास्तरीय देशभक्तिपर गीतगायन स्पर्धेत फाटक हायस्कूलच्या संघाने माध्यमिक गटात द्वितीय क्रमांक पटकावला. स्वातंत्र्यदिनानिमित्त ही स्पर्धा नवनिर्माण हायच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित केली होती. जिल्हाभरातून १३ संघ सहभागी झाले होते. फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उंच उंच गगनात तिरंगा.... या देशभक्तिपर गीताचे सादरीकरण केले. हार्मोनिअम साथ शर्विल ठीक याने तर पखवाजसाथ सार्थक पंडित यांनी केली. या संघात जुई जोशी, वेदा घाटे, ईश्वरी खाडीलकर, हर्षदा केळकर, रूद्र घडशी, शमिका शेवडे, वेदश्री सातवळेकर, आराधना नेवरेकर, शंतनू खानविलकर, यश मुळे आणि सर्वेश गोठणकर हे विद्यार्थी सहभागी झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख एक हजार रुपये, प्रमाणपत्र आणि चषक देऊन रत्नागिरी कोस्टगार्ड एअर ट्रॅफिक कंट्रोलर थापा आणि मुख्याध्यापक उल्हास सप्रे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
माने महाविद्यालयाचा वर्धापनदिन उत्साहात
साडवली ः आंबव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये २७वा वर्धापनदिन आणि संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला कार्यकारी अध्यक्षा नेहा माने, सहसचिव दिलीप जाधव, विश्वस्त जान्हवी माने, सीईओ प्रद्युम्न माने आदी उपस्थित होते. या निमित्ताने महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मेकॅनिकल विभागातील प्रा. डॉ. अच्युत राऊत यांना व्हायब्रेशन इंजिनिअरिंग पुस्तकातील त्यांचा संशोधन पेपर प्रकाशित झाल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.
‘सम्यक’तर्फे तुळशी येथे वृक्षारोपण
मंडणगड ः स्वातंत्र्य दिनाचे निमित्ताने सम्यक फाउंडेशन तुळशी यांच्यावतीने तुळशी येथे वृक्षारोपण व कृषीविषयक माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी सुनील खंदारे, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ आहेरकर, मंडळ कृषी अधिकारी राकेश मर्चंडे, साहाय्यक कृषी अधिकारी शंकर चेके, महसूल मंडळ अधिकारी मनोहर पवार, शाखा अभियंता देवकीनंदन सकपाळे, तुळशी ग्रामपंचायत प्रशासक पी. डी. गोसावी, ग्रामसेवक भास्कर लेंडे, चीफ इंजि. मुंबई महानगरपालिका संजय जाधव, पोलिस पाटील रमेश जाधव यांच्यासह अधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.