कोकण

चिपळूण पालिकेची प्रभाग रचना जाहीर

CD

चिपळूण पालिकेची प्रभाग रचना जाहीर
१४ प्रभागातून २८ नगरसेवक ; ३१ पर्यंत हरकतींची मुदत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ : येथील पालिकेत प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. निवडणुकीचा भाग म्हणून आज प्रशासनाकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.
शहरातील मध्यवर्ती भागातील प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. परिणामी, अंशतः बदल झालेल्या प्रभागात इच्छुकांमध्ये मतांच्या गणिताची बेरीज-वजाबाकी आणि जुळवाजुळव सुरू झाली आहे. यापूर्वी १३ प्रभागांमधून २६ नगरसेवकांची जनतेतून निवड करण्यात येत होती. १४ प्रभागांतून २८ नगरसेवकांची निवड होणार आहे. म्हणजेच एका प्रभागाची वाढ झाली आहे. शहरात एकूण १४ प्रभाग निश्चित करण्यात आले असून, २८ नगरसेवक या प्रभागांमधून निवडून दिले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवकांची निवड होईल.
जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार, कोणत्या प्रभागात कोणते भाग येतील आणि त्यांची मतदार संख्या किती आहे याची सविस्तर माहिती प्रशासनाने जाहीर केली. यामध्ये ४३२२ मतदार संख्या असलेला पेठमाप हा सर्वात मोठा प्रभाग ठरणार आहे. ३५१८ लोकसंख्या असलेला पागमळा-वीरेश्वर कॉलनी प्रभाग सर्वात लहान ठरला आहे. पालिका प्रशासनाच्या या घोषणेनंतर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, विविध पक्ष आणि स्थानिक नेत्यांनी निवडणूक समीकरणांचा विचार सुरू केला आहे.

कोट
चिपळूण पालिकेची प्रभाग रचना भौगोलिक परिस्थितीचा विचार करून तयार करण्यात आली आहे. नागरिकांना त्यात काही शंका असेल तर ३१ ऑगस्टला दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती नोंदवाव्यात. मुदतीत आलेल्या हरकतींचा विचार केला जाईल.
- विशाल भोसले, मुख्याधिकारी, चिपळूण पालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Wagholi News : मैदानातील ३० हजार चौरस फुटाचा पत्र्याचा मंडप अचानक कोसळला; सुदैवाने मंडपात विद्यार्थी नसल्याने जीवित हानी नाही

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्जांचा पाऊस! ५ हजार घरांसाठी ९८७२० अर्ज, 'या' तारखेआधीच भर फॉर्म

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : पावसाची संततधार सुरूच! पनवेलमधील शाळा आणि महाविद्यालयांना बुधवारी सुट्टी जाहीर

Mumbai Rain: ढगफुटीपेक्षा भयानक पाऊस? हवामान खात्याने दिला धोक्याचा इशारा, ३५० मिमी पाऊस झाला तर काय होईल?

SCROLL FOR NEXT