-rat१९p१६.jpg-
P२५N८५५०९
रत्नागिरी ः गणेशोत्सवानिमित्त आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह.
---
महामार्गावर वाहतूककोंडी होऊ देऊ नका
जिल्हाधिकारी देवेंदर सिंह ः प्रांत, तहसीलदार, पोलिस निरीक्षकांनी नियोजन करावे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी. संगमेश्वर आणि लांजा येथील पुलाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहील यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. त्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या आहेत.
गणेशोत्सवानिमित्त पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अप्पर पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, साहाय्यक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, जिल्ह्यात येणारे घाटरस्ते, महामार्ग या ठिकाणी वाहतूक मदतकेंद्र, रुग्णवाहिका, जेसीबी, क्रेन राहतील याचे नियोजन करावे. राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावेत. वळणरस्त्यावर रॅम्बलर, वेगमर्यादेबाबतचे फलक, आपत्कालीन संपर्क क्रमांक, दिशादर्शक, २४ तास फिरते गस्ती पथके यावर भर द्यावा. रिक्षाचालकांकडून अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नियोजन करावे. मुंबई तसेच इतर शहरातून रत्नागिरी येथे येणाऱ्या रेल्वेप्रवाशांकरिता रेल्वेस्थानकावर जादा बसेस परिवहन मंडळाने ठेवाव्यात.
चौकट
महामार्गावर सुविधा केंद्र
गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर पुढील ठिकाणी पोलिस मदतकेंद्र असणार आहेत. खेड-हॉटेल अनुसया, हॅप्पी धाबा, भोस्ते घाट, भरणेनाका. चिपळूण–सवतसडा दर्शन, कळंबस्ते तिठा, बहादूरशेख नाका, अलोरे घाटमाता, सावर्डे बाजारपेठ. संगमेश्वर–आरवली बसथांबा, देवरूख-मुर्शी बावनदी पुलापलीकडे, रत्नागिरी-हातखंबा तिठा, पाली, बावनदी पुलाच्या अलीकडे, कोकजेवठार येथील नवीन पुलाजवळ. लांजा-वेरळ कुवे गणपती मंदिरासमोर, राजापूर-बसस्थानक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.