कोकण

कणकवलीत ‘गड’- ‘जानवली’चे रौद्ररूप

CD

85467
वरवडे : येथील आचरा मार्गावर मंगळवारी दिवसभर पाणी असल्‍याने येथील वाहतूक बंद होती.
85470
नागवे ः येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्‍याने कणकवली नागवे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली.
85471
कणकवली ः शहरतील गणपतीसाणा पाण्याखाली गेला होता. तसेच लगतच्या जानवली पुलाकडे जाणारा मार्ग पाणी आल्‍याने बंद झाला होता. (सर्व छायाचित्रे ः परेश कांबळी, कलमठ)


कणकवलीत ‘गड’- ‘जानवली’चे रौद्ररूप

मुसळधारेमुळे तालुका ठप्प; रस्ते बंद, पूरग्रस्तांची सुरक्षेसाठी धावपळ


सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १९ ः गेले दोन दिवस विश्रांती न घेता मुसळधार कोसळणाऱ्या सरींमुळे कणकवली तालुक्‍यात पूरस्थिती उद्भवली आहे. गड आणि जानवली नदीचे पाणी रस्त्यावर आल्‍याने कणकवली-आचरा, कणकवली-सातरल, कणकवली-नागवे तसेच शिवडाव, भिरंवडे, सांगवे, दिगवळे आदी गावांतील वाहतूक ठप्प झाली. रात्रभर पाऊस सुरू असल्‍याने जानवली, आशिये, कलमठ आदी गावांतील सखल भागात पाणी घुसल्‍याने तेथील नागरिकांची सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ उडाली होती. अनेक मार्गावरील रस्ते वाहतूक बंद असल्‍याने एस.टी. सेवा देखील प्रभावित झाली आहे.
कणकवली शहर आणि तालुक्‍यात काल (ता.१८) मुसळधार सरी कोसळल्या. तर रात्रीपासून अव्याहतपणे पाऊस सुरू राहिल्‍याने पूरस्थिती निर्माण झाली. शहराच्या वेशीवरून वाहणाऱ्या गड आणि जानवली नद्या धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहेत. यात वरवडे येथे पाणी आल्‍याने कणकवली आचरा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. याखेरीज यंदा प्रथम कणकवली-नागवे रस्ता पाणी आल्‍याने ठप्प झाला.
-----
85468
मराठा मंडळ येथील बंधाऱ्यावरून पाणी
सातरल येथील मोरीवर पाणी आल्‍याने असरोंडी, अजगणीकडे वाहतूक थांबली होती. वैभववाडी-फोंडाघाट हा रस्ताही पाणी आल्‍याने बंद होता. याखेरीज नाटळ, दिगवळे, शिवडाव परबवाडी, दिगवळे येथीलही रस्ते आज वाहतुकीसाठी बंद होते. कणकवली आचरा मार्गावर कलमठ, वरवडे, पिसेकामते, रामगड आदी भागात ठिकठिकाणी पाणी असल्‍याने या मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच बंद झाली. या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात बिडवाडी मार्गे वळविली होती. दरम्‍यान, कणकवली ते वागदे जोडणाऱ्या मराठा मंडळ केटी बंधाऱ्यावरून पाणी वाहत होते. त्‍यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात आली. सुरक्षेचे उपाय म्‍हणून केटी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला नगरपंचायत कर्मचारी आणि पोलिस तैनात केले होते.
-------
85552
फोंडाघाटात दरड; तासभर वाहतूक ठप्प
शहरातील गणपती साणा देखील आज पाण्याखाली गेला. तसेच लगतच्या भागातून पाणी वाहत असल्‍याने जानवली पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली. सकाळी साडे दहाच्या सुमारास पावसाचा जोर ओसरल्‍यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुसळधार पावसाचा बीएसएनएल मोबाईल सेवेलाही फटका बसला असून तळेरे, खारेपाटण, कणकवली भागातील मोबाईल सेवा आज विस्कळीत होती. अनेक भागात वीज सेवा सुरळीत ठेवण्यात महावितरणला यश आले. मुसळधार पावसाचा मोठा फटका कणकवलीच्या आठवडा बाजाराला बसला. विक्रेते मोठ्या संख्येने आले असले तरी ग्राहक नसल्‍याने बाजारपेठेत वर्दळ कमी होती. आज दुपारी फोंडाघाटात दरड कोसळल्याने एक तास वाहतूक ठप्प झाली होती. ‘बांधकाम’ने दरड हटविल्यानंतर घाटमार्ग सुरळीत झाला.
----------------------
85472
पुराच्या पाण्यात मोटार घालणे अंगलट
कणकवली आचरा मार्गावरील सेंट उर्सुला हायस्कूलनजीक पुराचे पाणी आले आहे. या पुरात मोटार घालणे चालकाच्या अंगलट आले. एका सखल भागातून मोटार काढण्याचा प्रयत्‍न केला. मात्र मोटार पाण्यात गेल्‍यानंतर बंद पडली. त्‍यामुळे कंबरेएवढ्या पाण्यातून मोटारीतील प्रवाशांना बाहेर पडावे लागले.
---------------
नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा
कणकवली शहराच्या दोन्ही बाजूंनी वाहणाऱ्या गड नदी आणि जाणवली नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे. या दोन्ही नद्यांना पूरस्थिती निर्माण झालेली आहे. नद्यांच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या आणि परिसरातून राहणाऱ्या मंडळींनी सावधानता पाळावी. नदी किनाऱ्याला जाऊ नये, असे आवाहन कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.
---------------
85551.

खारेपाटणमध्ये शुकनदीने
इशारा पातळी ओलांडली

तळेरे, ता. १९ ः गेले दोन-तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे आज अखेर खारेपाटण येथील शुकनदीने इशारा पातळी ओलांडली. यामुळे खारेपाटण येथे पुरस्थिती निर्माण झाली आहे.
खारेपाटण येथील अनेक जोडरस्ते पुराच्या पाण्याखाली गेले असून मच्छि मार्केट, कोंडवाडी रस्ता, जैनवाडी रस्ता, या रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. बंदरवाडीकडे जाणारा घोडेपाथर येथे व खारेपाटण मुख्य बाजारपेठ रस्ता या रस्त्यावर अद्याप पाणी आले नाही. मात्र, जर पावसाचा जोर असाच राहिला तर या दोन मुख्य रस्त्यावरही पाणी येऊन रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांनी कोणतीही आपत्ती परिस्थिती ओढवत असेल तर त्वरित ग्रामपंचायत किंवा दक्षता समितीकडे संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : वोटर अधिकार यात्रेत राहुल गांधींच्या गाडीची पोलीस कर्मचाऱ्याला धडक अन्...; पुढे काय घडलं? वाचा...

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा कहर! भिंत कोसळल्याची घटना, रहिवाशांचे स्थलांतर

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Kidney Failure Causes: किडनी फेल होण्याचं कारण बनतो UTI? 'ही' 5 लक्षणं वेळीच ओळखा आणि उपाय जाणून घ्या

Wagholi News : मैदानातील ३० हजार चौरस फुटाचा पत्र्याचा मंडप अचानक कोसळला; सुदैवाने मंडपात विद्यार्थी नसल्याने जीवित हानी नाही

SCROLL FOR NEXT