काही सुखद--लोगो
-rat१९p८.jpg-
२५N८५४६२
लांजा ः गावातील सुशिक्षित तरुणांनी, ग्रामस्थांनी, महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीचा निर्णय घेतला आहे.
----
महिलांसह ग्रामस्थांच्या पुढाकारातून वाघ्रट गावात दारूबंदी
ग्रामपंचायतीचा निर्णय; मद्य पिणाऱ्यासह साठा करण्यावर आता होणार कडक कारवाई
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १९ : लांजा तालुक्यातील वाघ्रट गावाने दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील अनेक गावात उघडपणे दारू विक्री व्यवसाय सुरू असतानाच पोलिसांच्या भूमिकेवर अवलंबून न राहता वाघ्रट येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला आहे. गावात कोणाकडेही दारू आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.
वाघ्रट ग्रामसभेला तहसीलदार प्रियांका ढोले, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, राज्य उत्पादक शुल्क अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या तोंडावर दारूबंदीचा घेतलेला निर्णय सर्वांसाठी आदर्शवत ठरणारा आहे.
तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींना आदर्शवत ठरेल, असे काम वाघ्रट-वाडीलिंबू ग्रुपग्रामपंचायतीने केले आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्काराने सन्मानित आहेत; मात्र काही ग्रामपंचायती हद्दीमध्ये दारूधंदे सुरू असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी दाखल केल्या होत्या. त्या विरोधात पोलिस कारवाई करतील यावर विसंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेणे अपेक्षित असते; परंतु बहुसंख्य ग्रामपंचायती तसे पाऊल उचलत नाहीत. त्याला वाघ्रट-वाडीलिंबू ग्रुपग्रामपंचायत अपवाद ठरली.
तत्पूर्वी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये वाडीलिंबू आणि वाघ्रट गावामध्ये बिअरशॉपी चालवण्यासाठी परवानगी अर्ज केले होते; मात्र, नागरिकांनी आणि ग्रामपंचायतीने या मागणीला कडाडून तीव्र विरोध केला. दोन्हीही गावातील सुशिक्षित तरुण, ग्रामस्थांनी, महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीचा निर्णय घेतला. ग्रामसभेला सुमारे ३५० पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या.
----
चौकट
सहा दारूधंद्यांवर कारवाई
तालुक्यात पोलिसांनी छापा टाकून सहा ठिकाणी दारूधंदे उघडकीस आणले. या वेळी दारूबंदीविरोधात पोलिसांचे पाऊल कौतुकास्पद असले तरीही तालुक्यात अवैध दारूधंदे पूर्णतः बंद व्हायला हवेत, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. वाघ्रट-वाडीलिंबू ग्रुपग्रामपंचायतीतर्फे गावात पूर्णतः दारूबंदीवर ठराव एकजुटीने केला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
कोट
ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. असा निर्णय प्रत्येक गावाने घेतल्यास प्रत्येक गाव दारूमध्ये मुक्त होईल.
--नीळकंठ बगळे, पोलिस निरीक्षक, लांजा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.