कोकण

रत्नागिरी - एकच जिद्द, वाटद एमआयडीसी रद्दचा नारा

CD

rat19p29.jpg-
85544
मुंबईः येथील सभागृहात झालेल्या सभेला उपस्थित.
---------
एकच जिद्द, वाटद एमआयडीसी रद्द करा
मुंबईत जनसंवाद सभेत संघर्ष समितीचा नारा; शेती-मासेमारी वाचवण्यासाठी विरोध
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २०ः रोजगार निर्मितीच्या व विकासाच्या नावाखाली कोकणातील आंबा, काजू, भातशेती व मासेमारी या मुख्य उपजीविकेला बाधित असे प्रकल्प आणले जात आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील प्रस्तावित वाटद एमआयडीसीला आमचा विरोध आहे, असे संघर्ष कृती समितीच्या मुंबईतील दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात आयोजित जनसंवाद सभेत जाहीर करण्यात आले. या सभेमध्ये एकच जिद्द, वाटद एमआयडीसी रद्दचा नारा देण्यात आला.
दादर येथे झालेल्या सभेला ॲड. असीम सरोदे यांनी संवाद साधला. या वेळी प्रथमेश गावणकर, ॲड. रोशन पाटील, अतुल म्हात्रे, सहदेव वीर, संतोष बारगुडे उपस्थित होते. वाटद एमआयडीसी संघर्ष कृती समितीचे प्रमुख प्रथमेश गावणकर यांनी विविध पुराव्यांच्या आधारे संवाद साधताना वाटद एमआयडीसीबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्यांचा समाचार घेतला. ही लढाई कोणत्या व्यक्तीवरोधी नसून, येथील नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आहे. २०१९ला वाटद एमआयडीसी प्रस्तावित झाल्याचे सांगत २०२२ला वाटद एमआयडीसीसाठी प्रस्तावित जागा परवडणारी नसल्याचे कारण सांगून ती रद्द करण्यात येत असल्याची अधिसूचना जाहीर केली होती. १४ सप्टेंबर २०२४ला नवीन प्रस्तावित अधिसूचना जाहीर करून ३२/२ची नोटीस जाहीर केली. ९ दिवसात जमीन मोजणी प्रक्रिया सुरू झाली; मात्र एमआयडीसीला कोणत्या उद्योगासाठी जागा संपादित करायची आहे याचा अधिसूचनेत उल्लेख नाही. २५ सप्टेंबर २०२४ ला नोटीस काढून हरकती नोंदवण्याची नोटीस जाहीर केली. त्या जागेत कोणताही फेरबदल करायचा झाल्यास त्याला सरकारची अनुमती लागते; मात्र जमीनविक्री आजतागायत सुरू आहे. ३ ऑक्टोबर २०२४ला ५००पेक्षा अधिक सह्यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जनसुनावणी ही स्थानिक पातळीवर घेतली पाहिजे, ही आमची प्रमुख भूमिका होती. त्यानंतर ८ ऑक्टोबर २०२४ला स्मरणपत्र देऊन मोजणी प्रक्रिया उधळून लावली. ‌९ दिवसात कारवाई करणारे सरकार आमच्या मागणीला उत्तरे द्यायला ८ महिने लावते, अशी शोकांतिकाही गावणकर यांनी व्यक्त केली.
वाटद येथील समर्थनार्थ १० हजार लोकं एकत्रित आली तरीही ती एक दिवस येतील. आम्ही एक हजार असू; परंतु शेवटपर्यंत लढू, असा इशारा त्यांनी दिला. वाटद एमआयडीसी रद्दची अधिसूचना जाहीर होत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

चौकट
चाकरमान्यांनी समाजबांधवांना सहकार्य करा
वाटद एमआयडीसी विरोधकांची बाजू समजून घेतली पाहिजे. ८५० सातबारे काढले त्यात खरेदी करणारे नेते, प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचेच लागेबांधे अधिक आहेत. जमीन खरेदी करणारे हे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय असल्याचे गवाणकर यांनी सांगितले. मुंबईस्थित ग्रामस्थांनी गणपती, शिमगोत्सव, दिवाळी अशा महत्वाच्या सणांना गावी येतात तेव्हा गावातील समाजबांधवांना सहकार्य करा, असेही त्यांनी कोकणातील मुंबईस्थित बांधवांना आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT