कोकण

कणकवली नगरपंचायतीची नवीन प्रभाग रचना जाहीर

CD

29679

कणकवली नगरपंचायतीची नवीन प्रभाग रचना जाहीर

१७ प्रभागांतून उमेदवार निवडले जाणार; २१ पर्यंत हरकती नोंदवता येणार

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. १९ : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीची एक सदस्यीय प्रभाग रचना जाहीर झाली आहे. या नव्या प्रभाग रचनेवर २१ ऑगस्ट पर्यंत नागरिकांना हरकती नोंदवता येणार आहेत. नगरपंचायतीची यापूर्वीची निवडणूक एप्रिल २०१८ मध्ये झाली होती. त्‍यावेळीही एक सदस्यीय प्रभाग रचना तयार केली होती. तसेच थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडला होता. त्‍याच धर्तीवर यंदाही प्रभाग रचना तयार केली असून त्‍यावर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविल्या आहेत.

अशी आहे नवीन प्रभाग रचना
प्रभाग -१ : (लोकसंख्या ८३७) व्याप्ती : निम्मेवाडी, मधलीवाडी, करंबेळकरवाडी, सुतारवाडी, पिळणकरवाडी. उत्तर दिशा - जानवली नदीपासून उत्तर-पश्‍चिम हद्दीपर्यंत. पूर्वेला - नागवे हद्द ते निम्मेवाडी रेल्वेलाइन हद्दीपर्यंत. दक्षिण - श्री.म्‍हसकर घर मार्गे महारूद्र अपार्टमेंट पर्यंतचा रस्ता. पश्‍चिम - जानवली नदी ते रवळनाथ मंदिर मार्गे मच्छीमार्केट रस्ता मार्गे श्री.म्हसकर घर

प्रभाग - २ (लोकसंख्या ११००, व्याप्ती : वरचीवाडी, घाडीवाडी, धनगरवाडी, समर्थनगर. उत्तरेला : जानवली नदीपासून उत्तर पूर्वेस मौजे नागवे हद्दीपर्यंत. पूर्व : हरकूळ ब्रुदुक सीमेपर्यंत. दक्षिण - पटकीदेवी मंदिर मधलीवाडी ते वरचीवाडी मधील नाला.
पश्‍चिमेला : जानवली नदी ते रेल्वेलाइन मार्ग महारूद्र अपार्टमेंट पर्यंत.

प्रभाग - ३ (लोकसंख्या ९६६) - व्याप्ती : बांधकरवाडी, शिवशक्तीनगर व लगतचा परिसर. उत्तरेला - दत्तमंदिर पासून दत्ताराम साटम यांचे घरापर्यंत. पूर्वेला - दत्ताराम साटम घर ते लक्ष्मण ठाकूर घरापासून नाल्यापर्यंतचा भाग. पश्‍चिमेला - दत्तमंदिर बांधकरवाडी रस्त्यापासून कलिंगण घर ते मारूती मंदिर ते नवीन नरडवे रस्ता चौक. दक्षिणेला - नवीन नरडवे चौक ते बांधकरवाडी तिठा, शिवशक्तीनगर मार्गे गडनदी पर्यंत.

प्रभाग - ४ (लोकसंख्या १०९१) : व्याप्ती : परबवाडी, शिवाजीनगर, जळकेवाडीमधील शिवाजीनगर लगतचा परिसर पश्‍चिम भाग. उत्तर : गोविंद पाटकर घर ते बिले अपार्टमेंट पर्यंत. पूर्व : विष्णू अपार्टमेंट ते संदीप नलावडे घर. पश्‍चिमेला - जळकेवाडी येथील नाला आणि दक्षिणेला भाऊ सावंत घर मार्गे गणपत सावंत घर.

प्रभाग - ५ (लोकसंख्या ११७७) : व्याप्ती : विद्यानगर. उत्तर दिशा : बाळा बांदेकर यांचे जवळील नाला ते श्री.आमणे घरामागील नाला. पूर्व :श्री.आमणे घर ते डीएसपी गार्डन पर्यंत नाला. पश्‍चिम : श्री.नेवगी घर ते अलका सावंत घरापर्यंतचा नाला. दक्षिण : अलका सावंत घर ते प्रांत ऑफिस

प्रभाग - ६ (लोकसंख्या ९१३ : व्याप्ती - दक्षिण बाजारपेठ. उत्तर : अप्पासाहेब पटवर्धन चौक ते सुभद्रा घुरसाळे यांचे घरापर्यंतचा बाजारपेठ रस्ता. पूर्वेला - सुभद्रा घुरसाळे घर. पश्‍चिम : अप्पासाहेब पटवर्धन चौक, राष्ट्रीय महामार्ग ते श्री.कोरगावकर घर रस्ता. दक्षिण : राष्ट्रीय महामार्ग ते नगरपंचायत कार्यालय समोरील रस्ता.

प्रभाग - ७ (लोकसंख्या १०६६) : व्याप्ती - बाजारपेठ रस्त्याच्या उत्तरेकडील भाग, भालचंद्र नगर. उत्तरेला : राष्ट्रीय महामार्ग ते टकले हॉटेल मार्गे तात्या हर्णे घरापर्यंत. पूर्वेला : तात्या हर्णे घर ते भवानी मंगल कार्यालय. दक्षिणेला : भवानी मंगल कार्यालयापासून पटवर्धन चौकापर्यंत. पश्‍चिमेला : कोहिनूर परमिट रूम, राष्ट्रीय महामार्ग ते बाळकृष्ण मोर्ये यांचे घर.

प्रभाग - ८ (लोकसंख्या - ९६६) : व्याप्ती : बौद्धवाडी, फौजदारवाडी. उत्तरेला : जानवली नदी गणपती साणा ते फौजदारवाडी लगत जानवली हद्दीपर्यंत. पूर्वेला : जानवली नदी ते उमेश बुचडे घर मार्गे माऊली नगर मधील सुहासिनी चव्हाण घरापर्यंत. दक्षिणेला : जि.प.शाळा क्र.३ ते बौद्धवाडी अंतर्गत रस्ता. पश्‍चिमेला : जानवली नदी गणपती साणा ते शाळा नं.३ पर्यंत.

प्रभाग - ९ (लोकसंख्या - ११०३). व्याप्ती : टेंबवाडी रस्त्याच्या पूर्वेकडील भाग, कांबळी गल्ली : उत्तरेला : आम्रपाली अपार्टमेंट ते जानवली नदी गणपती साणा हद्द, पूर्वेला : जानवली नदी गणपती साणा ते भालचंद्र महाराज मठ हद्द. पश्‍चिमेला आम्रपाली अपार्टमेंट ते श्री.ठाकूर यांच्या घरापर्यंतचा नाला. दक्षिणेला : श्री.ठाकूर घर ते टकले हॉटेल पर्यंत.

प्रभाग - १० (लोकसंख्या ११४५) व्याप्ती : हायवेच्या पूर्वेकडील टेंबवाडी भाग, गांगोवाडी. उत्तरेला : मौजे कलमठ हद्दीपर्यंत, पूर्वेला : आम्रपाली अपार्टमेंट जवळीला नाला ते अंधारी गिरण पर्यंत नाला. दक्षिण ः ठाकूर घरापर्यंतचा नाला ते मसुरकर संकुल.
पश्‍चिमेला : कलमठ हद्दीपर्यंत,

प्रभाग - ११ ( लोकसंख्या १०२२) ः व्याप्ती - सोनगेवाडी, तेलीआळी येथील हायवे लगतचा भाग. उत्तरेला : मसुरकर संकुल ते ठाणेकर संकुल मार्गे डी.पी.रोड पर्यंत. पूर्वेला : सोनूशीला कॉम्प्लेक्‍स ते उषा कन्स्ट्रक्शन संकुल मार्गे राष्ट्रीय महामार्ग पर्यंत. पश्‍चिमेला : मौजे कलमठ व आशिये हद्दीपर्यंत. दक्षिणेला : शिवाजी पुतळा ते एस.टी.डेपो मार्गे आशिये हद्दीपर्यंत.

प्रभाग - १२ (लोकसंख्या ९७२) : स्थळ : हर्णे आळी, तेलीआळी उर्वरित भाग. उत्तर : सोनूशीला कॉम्प्लेक्‍स मार्गे दत्तात्रय डिचोलकर घर ते चिकन सेंटर पर्यंत पाणंद. पूर्व : बाळा बांदेकर नाला ते रामेश्‍वर प्लाझा संकुल पर्यंत. पश्‍चिम : सोनूशीला कॉम्प्लेक्‍स ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा. दक्षिण : आबू तायशेटे हॉस्पिटल ते रामेश्‍वर प्लाझा जवळील नाला.

प्रभाग - १३ : ( लोकसंख्या ८४०) व्याप्ती : नेहरू नगर, बिजलीनगर. उत्तर : जुवेकर मेडिकल ते एस.टी. स्टँड पर्यंत. पूर्व : जुवेकर मेडिकल ते बिजलीनगर रस्ता. दक्षिण- मराठा मंडळ रस्ता. पश्‍चिम : मौजे आशिये हद्दीपर्यंत.

प्रभाग- १४ : (लोकसंख्या ७१४) व्याप्ती : जळकेवाडी उर्वरित दक्षिण भाग. उत्तर : ब्राम्‍हणदेव मंदिर ते डॉ.म्‍हसकर हॉस्पीटल पर्यंत. पूर्व : डॉ.म्हसकर हॉस्पिटल ते कणकवली कॉलेज रस्ता. दक्षिण : म्‍हापसेकर घर ते नरडवे रस्ता. पश्‍चिम : म्हापसेकर घर ते सरंगले कॉम्प्लेक्‍स पर्यंत.

प्रभाग - १५ (लोकसंख्या - ८१४). व्याप्ती : नाथ पै नगर, शिवाजीनगर मधील रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग. उत्तर : शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी पुतळा, नवीन नरडवे रस्ता मार्गे रगजी घरापर्यंत. पूर्व : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गडनदीपर्यंत. दक्षिण ः गडनदी ते मराठा मंडळ स्मशानभूमी. पश्‍चिम मराठा मंडळ स्मशानभूमी ते राष्‍ट्रीय महामार्ग

प्रभाग - १६ (लोकसंख्या - ७१०) व्याप्ती : परबवाडी मधील उर्वरित भाग व शिवाजीनगर मधील दक्षिणेकडील भाग. उत्तर : परबवाडी रस्ता ते चव्हाण घर. पूर्व ः चव्हाण घर ते नरडवे रस्ता. दक्षिण ः रगजी घर ते दळवी घरापर्यंत नरडवे रस्ता. पश्‍चिम ः शिवाजी नगर येथील सावंत चाळ ते रगजी घरापर्यंत अंतर्गत रस्ता.

प्रभाग - १७ (लोकसंख्या ९६२) व्याप्ती : कनकनगर. उत्तर : शिवशक्ती हॉल ते सरकारे घरापर्यंत नरडवे रस्ता. पूर्व : सरकारे घर ते गडनदीपर्यंत. पश्‍चिम : शिवशक्ती हॉल ते गडनदीपर्यंत (रेल्वे लाइन). दक्षिण : गडनदीपर्यंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT