कोकण

साखरपा ः महिला घडवत आहेत देखण्या गणेशमूर्ती

CD

येई गणेश---------लोगो

85757

महिलांच्या कुशाग्रतेतून साकारल्या जातात गणेशमूर्ती
भडकंबा येथील जामसंडेकरांची मूर्तिशाळा; चार पिढ्यांची गणेश परंपरा

एक नजर
* यंदा मूर्तिशाळेत सात महिला कार्यरत
* पाच दशकांची मूर्तिशाळा
* घोड्यावरच्या गणेशाचे वैशिष्ट्य
* नोकरी सांभाळून कारखान्यात काम

सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता २० : मूर्तिशाळा म्हटलं की, समोर येतात ते पुरुष मूर्तिकार आणि त्यांना साह्य करणाऱ्या, किरकोळ कामे करणाऱ्या या महिला; पण याला छेद देणारी मूर्तिशाळा भडकंबा (ता. संगमेश्वर) येथील संतोष उर्फ बाळू जामसंडेकर यांची आहे. इथे महिला मूर्तिकार गणेशमूर्ती साकारत आहेत.
जामसंडेकर यांचा गणेशमूर्ती कारखाना हा गेल्या सुमारे ५० वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या आजोबा शंकर सीताराम जामसंडेकर यांनी सुरू केलेला हा कारखाना वडील चंद्रकांत यांनी पुढे सुरू ठेवला. वडील खरंतर प्राथमिक शिक्षक; पण त्यांच्या वडिलांची कला त्यांनी पुढे जोपासली. शाळेची नोकरी सांभाळून त्यांनी कारखाना वाढवला. त्यांचा मुलगा संतोष आता ही जबाबदारी सांभाळत आहेत. संतोष हे स्वत: सुवर्णकार आहेत. गणपतीच्या काळात तीन महिने दुकान पूर्णपणे बंद ठेवून ते गणेश मूर्तिशाळेकडे लक्ष केंद्रीत करतात. सध्या संतोष यांचा मुलगाही ही कला जोपासत आहे. त्याच्या रूपानं जामसंडेकर यांची चौथी पिढी या क्षेत्रात उतरली आहे.
घोड्यावर स्वार झालेला गणेश हे संतोष यांचे वैशिष्ट्य आहे. या मूर्तींना परिसरात मोठी मागणी आहे. यंदा सुमारे १२५ घोड्यावर स्वार झालेल्या मूर्ती त्यांनी काढल्या आहेत. जामसंडेकर यांच्या मूर्तिशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे सात महिला कामगार कार्यरत आहेत. या महिला परिसरातीलच असून, त्या माती मळण्यापासून ते मूर्ती तयार करणे आणि त्यानंतरचे रंगकाम अशी सगळी कामे स्वत: पुढाकार घेऊन करतात. सकाळी आठ वाजल्यापासून त्या मूर्तिशाळेत कामाला प्रारंभ करतात. गणेशोत्सव ऐन तोंडावर आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत म्हणजे अकरा वाजेपर्यंतही या महिला मूर्तिशाळेत राबून मूर्ती बनवत आहेत.

कोट
मातीच्या मूर्ती काढणं ही खरी कला आहे. केवळ पुरुषच ही कला जाणतात हा गैरसमज आहे. महिलाही तेवढ्यात ताकदीने ही कला जोपासत आहेत. आमच्या मूर्तिशाळेमुळे परिसरातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला, याचे समाधान आहे.
- संतोष (बाळू) जामसंडेकर, भडकंबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Latest Marathi News Live Update: राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती - अतुल सावे

SCROLL FOR NEXT