मॅरेथॉन स्पर्धेत
इच्छा राजभरणे प्रथम
सावर्डे : स्वातंत्र्यदिनानिमित्त चिपळूण रोटरी क्लब आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत सावर्डेतील सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम विद्यालयाची धावपटू इच्छा राजभरणे हिने १४ वर्षांखालील वयोगटात दोन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. महिलांच्या खुल्या गटातील मॅरेथॉन स्पर्धेत हुमेरा सय्यदला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत परिसरातील २५० हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. यापूर्वी मुंबईतील यंग इंडिया क्लबने आयोजित मॅरेथॉनमध्ये इच्छाने प्रथम क्रमांक मिळवला होता. तिचा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव झाला होता.
-----
स्नेहबंध मंचतर्फे
साहित्य वाटप
चिपळूण ः स्नेहबंध मंच चिपळूण या सामाजिक संस्थेमार्फत तालुक्यातील कुंभार्ली कातकरवाडीतील एकूण ९ कुटुंबांना साड्या, पॅण्ट, शर्ट, बेडसीट, टॉवेल, चादरी, सतरंज्या, स्वेटर असे सुमारे १०० ते १२० नगाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम स्नेहबंध मंचचे अध्यक्ष सीताराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तर कुंभार्ली सरपंच रवींद्र सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. स्नेहबंध मंचने या वर्षात आजपर्यंत एकूण १४ सामाजिक उपक्रम राबवले आहेत. घरेलू महिला कामगार यांची मोफत आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी, लिलाबाई आधार आश्रम गाने कळकवणे येथे फळे व पुस्तके वाटप, शिरळ येथील वाचनालयाला पुस्तके वाटप, शाळा वडार कॉलनी, चिंचघरी व खेर्डी देऊळवाडी या शाळांतील मुलांना वह्यावाटप, शालेय वाचनालयाला पुस्तके वाटप, जागतिक महिलादिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. महाराष्ट्र दिन १ मे कामगारदिनी महिला घरेलू कामगारांना टिफिन बॉक्स वाटप, लिलाबाई आधार आश्रम कळकवणे येथे कायमस्वरूपी दोन वर्तमानपत्रे सुरू करून दिली आहेत. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ही संस्था काम करत असल्याचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.
----
सावर्डेत माजी विद्यार्थी
पुनर्भेट सोहळा
सावर्डे ः सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या डिप्लोमा इन फार्मसी विभागातर्फे आयोजित माजी विद्यार्थी पुनर्भेट सोहळा २०२५ मोठ्या उत्साहात पार पडला. मनात घर केलेल्या आठवणींचा रियुनियन या संकल्पनेवर आधारित या सोहळ्यासाठी महाविद्यालयीन परिसर आकर्षक सजवण्यात आला होता. शिक्षणमहर्षी गोविंदराव निकम सभागृहात आयोजित या सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि गप्पांच्या मैफलीने कार्यक्रम रंगतदार झाला. माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करत नव्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते उपस्थित माजी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राधा गोविंद फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, प्रा. डॉ. ललिता नेमाडे, प्रा. डॉ. अश्विनी पाटील, प्रा. डॉ. अनुराधा गावडे, प्रा. मदन पोमाजे, प्रा. प्रीतम चौधरी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.