rat२०p३.jpg-
२५N८५७३२
रत्नागिरी : क्विक हिल फाउंडेशन व सायबर वॉरियर्सनी विद्यार्थी, प्राध्यापकांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक केले.
विद्यार्थ्यांनी घेतली सायबर सुरक्षा शपथ
गोगटे महाविद्यालय; जागरूकतेचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात ‘सायबर शिक्षा सायबर सुरक्षा’ या अभियानांतर्गत विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. टू फॅक्टर ऑथेन्टिकेशन या महत्त्वपूर्ण सायबर सुरक्षा तंत्रज्ञानावरील मार्गदर्शनाने झाली. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोशल मीडिया खाते, ई-मेल आयडी, बँकखात्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी या तंत्राचा उपयोग कसा होतो, याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
सायबर सुरक्षा जनजागृती अधिक आकर्षक करण्यासाठी महाविद्यालयाच्या परिसरात सायबर अवेअरनेस सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने या सेल्फीपॉईंटवर छायाचित्रे काढून सोशल मीडियावर शेअर केली. अशा प्रकारचे सायबर सुरक्षा तंत्रज्ञानावरील उपक्रम राबवल्याने भविष्यात येणारे संभाव्य धोके टाळू शकतो, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आणि असे उपक्रम भविष्यात घेण्याचे आश्वासनदेखील दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.