कोकण

अमली पदार्थांविरोधात खारेपाटणमध्ये जागृती

CD

swt2015.jpg
85886
खारेपाटण ः येथील बस स्थानकात अमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली.

अमली पदार्थांविरोधात
खारेपाटणमध्ये जागृती
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २१ : खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस अंमलदार मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बस स्थानक येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती उपक्रम राबविला. सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवानिमित या कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी अमली पदार्थ विरोधी प्रसिद्धी पत्रके उपस्थित नागरिकांना देण्यात आली.
या कार्यक्रमाला संकेत शेट्ये, संतोष पाटणकर, शक्तीकेंद्र प्रमुख सुधीर कुबल, सूर्यकांत भालेकर, माजी सरपंच किशोर माळवदे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे, रामा पांचाळ, गणेश कारेकर, सचिन भालेकर यांसह खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी पराग मोहिते, अवधूत गुनिजन, उद्देश कदम आदी उपस्थित होते. मिलिंद देसाई यांनी, या अभियानात आपण सर्वांनी सहभाग घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा नशामुक्त करूया, असे आवाहन नागरिकांना केले.
..........................
swt2016.jpg

पाटः सुयश पाटकरला शुभेच्छा देताना मान्यवर.

‘व्हॉलीबॉल’ चाचणीसाठी
सुयश पाटकरची निवड
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २१ः श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय निवड चाचणीत कोल्हापूर विभागातून एस. एल. देसाई विद्यालय पाटच्या सुयश पाटकर याची निवड झाली. आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाद्वारा वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल १५ वर्षे मुले व मुली चॅम्पियनशिप ४ ते १३ डिसेंबर या कालावधीत चीनमध्ये होणार आहे.
या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार असून या संघाची निवड करण्यासाठी भारतीय शालेय महासंघाने राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन १९ व २० ऑगस्ट कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी पुणे येथे केले आहे. या निवड चाचणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एस. एल. देसाई पाट विद्यालयातील खेळाडू सुयश पाटकर याची निवड करण्यात आली. त्याला प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, क्रीडाशिक्षक संजय पवार, दत्तात्रय कुबल, राष्ट्रीय खेळाडू रुपेश कोनकर, चारुहास वेंगुर्लेकर, अमित हर्डीकर यांचे लाभले. सुयशचे संस्थाध्यक्ष दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर, सचिव विजय ठाकूर, पदाधिकारी, मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांच्यासह कर्मचारी वर्ग, ग्रामस्थांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT