कोकण

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी

CD

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी
महारक्तदान शिबिरास प्रतिसादः सावंतवाडीत रोटरी क्लबचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ः रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. (कै.) बाळभाई बांदेकर यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सबनीसवाडा येथील रोटरी ट्रस्ट हॉलमध्ये हे शिबिर पार पडले. यावेळी ६० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे म्हणाले, रक्तदान हे खरे जीवनदान आहे. आपल्या शरीरातील रक्त हे काही दिवसांनी नैसर्गिकरित्या पुन्हा तयार होते. त्यामुळे एका व्यक्तीने केलेले रक्तदान दुसऱ्या व्यक्तीसाठी जीवनवाहिनी ठरू शकते. आज आपण दिलेले रक्त कुणाच्यातरी वडिलांना, मुलाला किंवा आईला नवे आयुष्य देईल. हे केवळ एक सामाजिक कार्य नाही, तर एक माणुसकीची कृती आहे. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे मी आभार मानतो.’’
हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने सार्थक फाउंडेशन आणि ऑनकॉल रक्तदाता संस्था, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित केला. या शिबिरामध्ये गोवा मेडिकल कॉलेजच्या अनुभवी डॉक्टरांसह अधिकारी वर्गाने सहभाग घेऊन रक्त संकलनाचे कार्य केले. संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी जीवनदान ठरणार आहे, असे आयोजकांनी सांगितले. या शिबिरात अनेक सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. यात युवा रक्तदाता संघटना, पत्रकार संघ, सामाजिक बांधिलकी संघटना, रोट्रॅक्ट क्लब व इनरव्हील क्लब सावंतवाडी यांचा समावेश होता.
सचिन रेडकर, बाबली गवंडे, सतीश बागवे, श्री. मदने, दिनेश गावडे, अनंत उचगावकर, रवी जाधव, रुपा मुद्राळे, सिद्धेश सावंत, केदार बांदेकर, प्रवीण परब, डॉ. शुभम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव कोसळले, मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांत आज काय आहे भाव? जाणून घ्या

Teacher Recruitment : राज्यात २० हजार शिक्षकांची पदे होणार कमी; शिक्षक संघटनांच्या याचिका काढल्या निकाली

Chief Justice of India : न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ; छोट्या गावातील वकील ते देशातील सर्वोच्च पदाला गवसणी...

'ये जवानी'ची जोडी परत येणार? रणबीर-दीपिका पुन्हा एकत्र काम करणार? दीपिकाच्या छोट्याशा रिअ‍ॅक्शनमुळे चाहत्यांमध्ये चर्चा

TET Exam : “माझी परीक्षा महत्त्वाची की लग्न?”; मुलाच्या प्रश्नाने हतबल पित्याच्या डोळ्यात अश्रू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT