कोकण

-मूक; पण घातक आजार ः उच्च रक्तदाब

CD

आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक----------लोगो
(८ ऑगस्ट टुडे ४)
उच्च रक्तदाबाविषयीची जागरूकता ही लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने एक महत्त्वाची पायरी आहे. वेळेवर निदान, योग्य उपचार आणि निरोगी जीवनशैलीद्वारे आपण या मूक; पण घातक आजारावर नियंत्रण मिळवू शकतो. आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि गंभीर गुंतागुंतींपासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने रक्तदाबाबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब बहुधा कोणतीही ठोस लक्षणे न देता शरीरात आपले नुकसान चालू ठेवतो. त्यामुळे तो सायलेंट किलर म्हणून ओळखले जाते. याच्या निदानात उशीर झाल्यास हृदयरोग, स्ट्रोक, मूत्रपिंडाचे विकारासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे वेळेत निदान होणे आणि योग्य व्यवस्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे.

rat२१p२२.jpg-
25N86043
डॉ. समीर दळवी
लाईफकेअर हॉस्पिटल फिजिशियन, चिपळूण
---
मूक; पण घातक आजार ः उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब हा एक मूक; पण गंभीर आजार आहे. त्यासंबंधी जागरूकता म्हणजे या आजाराची सखोल माहिती, त्याची कारणे, लक्षणे, परिणाम आणि उपचार यांची समज. ही जागरूकता लोकांमध्ये आरोग्याबाबतची जाणीव वाढवते, प्रतिबंधात्मक उपायांची गरज पटवते आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहित करते.
लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव आणि परिणाम दैनंदिन जीवनातील धावपळ, आरोग्यसेवेची मर्यादित उपलब्धता, चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबतची अज्ञानता हे अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची कारणे ठरतात. परिणामी, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो तसेच दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो. जरी अनेकदा लक्षणे दिसत नाहीत तरी काही लोकांमध्ये खालील तक्रारी आढळू शकतात. डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, श्वास घेण्यात अडचण, छातीत दुखणे, दृष्टिदोष, नाकातून रक्त येणे अशा गंभीर लक्षणांची उपस्थिती वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती सूचित करू शकते. निदान आणि तपासण्या उच्च रक्तदाबाचे निदान करण्यासाठी डॉक्टर रक्तदाब मोजतात तसेच रक्त, मूत्र चाचण्या व अन्य तपासण्या करतात. यामुळे आजाराची तीव्रता, मूळ कारणे आणि शरीरावर झालेल्या परिणामांची माहिती मिळते. सर्व प्रौढांनी (१८ वर्षांवरील) दरवर्षी एकदा तरी रक्तदाब तपासून घ्यावा.
*लहान मुलांसाठी (० ते १२ वर्षे) प्रतिबंधात्मक उपाय ः फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये द्यावीत. मीठ, साखर व प्रक्रिया केलेले अन्न मर्यादित द्या. दररोज किमान ६० मिनिटे शरीराची हालचाल होईल इतकी क्रिया करा. योग्य वजन राखण्यासाठी आरोग्यदायी सवयी लावा. घरात आणि आजूबाजूला धूरविरहित वातावरण ठेवा.
नियमित बालरोगतज्ज्ञांकडे तपासणी ः वाढ, वजन व रक्तदाबाचे निरीक्षण.
वंशपरंपरागत इतिहास तपासा ः जर कुटुंबात उच्च रक्तदाबाचे रुग्ण असतील तर जास्त जागरूक राहावे.
स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा ः दररोज २ तासांपेक्षा कमी स्क्रीन टाइम.

*किशोरवयीन मुले (१३ ते १९ वर्षे) ः
प्रतिबंधात्मक उपायात संतुलित जीवनशैली शिकवा ः मीठ व जंकफूड कमी, पोषणमूल्य असलेले अन्न वाढवा. धावणे, पोहणे, सायकल चालवणे यासारखी क्रिया प्रोत्साहित करा. अभ्यास व सामाजिक दबाव यावर नियंत्रणासाठी संवाद साधा. धूम्रपान व दारूपासून दूर राहा, हानिकारक पदार्थांबद्दल जागरूकता हवी. विशेषतः जर वजन जास्त असेल किंवा कौटुंबिक इतिहास असेल, डोकेदुखी, थकवा यासारखी लक्षणे दुर्लक्षित करू नयेत.
बीएमआय वर लक्ष ठेवा ः वजन व उंचीच्या प्रमाणात शरीराची स्थिती तपासा.
२० ते ३९ वर्षे या वयोगटात प्रतिबंधात्मक उपाय करताना दर २-३ वर्षांनी रक्तदाब तपासा (जोखीम असल्यास दरवर्षी)
डाएट पाळा ः मीठ कमी (<२३०० मिग्रॅ/दिवस) (दिवसाला एक चमच्यापेक्षा कमी). भरपूर फळभाज्या खा. आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम. तंबाखू व सिगरेटपासून पूर्णतः दूर राहा.
*खबरदारीची पावले म्हणून तणावावर नियंत्रण ठेवा ः योग, ध्यान, छंद यांचा वापर करा.
घरी BP मॉनिटर वापरा ः जोखमीच्या रुग्णांनी घरीच नियमित तपासणी करावी.
दुय्यम कारणे शोधा ः उदा. थायरॉईड, मूत्रपिंड विकार.
४० ते ५९ वर्षे वयोगटातील वार्षिक BP तपासणी ः या वयोगटात जोखीम जास्त असते. जीवनशैलीत आहार, व्यायाम, वजन नियंत्रण यावर भर.
योग्य झोप व विश्रांती ः निद्रानाश व स्लीप अ‍ॅप्निया यावर उपाय.
दारूचे प्रमाण मर्यादित ः पुरुष दिवसाला २ पेक्षा कमी; महिला दिवसाला १ पेक्षा कमी.
लिपिड व रक्तातील साखरेची तपासणी ः मेटाबॉलिक सिंड्रोम टाळण्यासाठी.
औषधाची गरज पडल्यास वेळेवर सुरू करा ः जर फक्त आहार-व्यायाम अपुरा वाटला तर
डोळे व मूत्रपिंड तपासणी ः गुंतागुंतीच्या आजारांचे लवकर निदान, अशी खबरदारीची पावले उचलली पाहिजेत.
*६० वर्षांवरील लोकांकरिता नियमित BP तपासणी ः दर ३–६ महिन्यांनी करावी.
कृत्रिम मीठ कमी व पोटॅशियमयुक्त आहार ः जर मूत्रपिंड कार्य योग्य असेल तर.
सुरक्षित व्यायाम ः चालणे, हलका व्यायाम.
सहविकार रोग नियंत्रण ः मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार इत्यादी.
अत्यधिक रक्तदाब नियंत्रणामुळे चक्कर येऊ शकते. औषधांचे परीक्षण करून साइडइफेक्ट व इतर औषधांशी जुळवून घ्या.
*सर्व वयोगटांनी लक्षणे ओळखा. वारंवार डोकेदुखी, चक्कर, धुंद डोळे याची दखल घ्या. जीवनशैली बदलण्यासाठी सामाजिक पाठिंबा महत्त्वाचा.
तंत्रज्ञानाचा वापर ः होम BP मॉनिटर, मोबाईल अ‍ॅप्सचा वापर करा.
उच्च रक्तदाब निर्माण होण्यामागे दोन प्रकारचे घटक असतात. अतिमीठ व चरबीयुक्त आहार, कमी फळे आणि भाज्या
शारीरिक निष्क्रियता, तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन लठ्ठपणा किंवा अधिक वजन हे बदलता येणारे घटक आहेत.
बदलता न येणारे घटक वय, कौटुंबिक इतिहास, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, तणाव, काही औषधे, वायू प्रदूषण.
बालपणापासूनच निरोगी जीवनशैली अंगीकारल्यास उच्च रक्तदाबाचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येतो. त्यासाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. संतुलित आणि कमी मीठ असलेला आहार, दररोज नियमित व्यायाम, पुरेशी झोप (७–८ तास), निरोगी वजन राखणे, प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरयुक्त पेये टाळणे, स्क्रीनटाइम कमी ठेवणे.
बऱ्याच वेळा, आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार, आहार, व्यायाम, वजन नियंत्रण आणि तणाव व्यवस्थापन यामध्ये बदल केल्यास फायदेशीर ठरते. कधी कधी फक्त जीवनशैलीतील बदल पुरेसे नसतात. अशा वेळी डॉक्टर औषधांची शिफारस करतात. रक्तदाब किती आहे, इतर आजार आहेत का यावरून औषधाचा प्रकार ठरतो. कधीकधी दोन किंवा अधिक औषधांचे संयोजनही आवश्यक ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT