कोकण

बोर्ड परीक्षेसाठी नोंदणीला सुरुवात

CD

बोर्ड परीक्षेसाठी
नोंदणीला सुरुवात
रत्नागिरी ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावी परीक्षांसाठी खासगी विद्यार्थी (फॉर्म नं.१७) योजनेंतर्गत १ ऑगस्टपासून ऑनलाइन नावनोंदणी सुरू केली आहे. शिक्षण अर्धवट राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी या महत्त्वपूर्ण योजनेत चालू वर्षी ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत प्रत्येक शाळेत ५० विद्यार्थीसंख्येच्या मर्यादेत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. क्षीरसागर यांनी सांगितले, ही योजना नियमित शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडणारी आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६च्या परीक्षांसाठी नोंदणी १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून, नोंदणीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. नावनोंदणीनंतर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. नोंदणी प्रक्रिया: नोंदणीसाठी अर्ज http://www.mahahsscboard.in संकेतस्थळावर स्टुडंट कॉर्नर या टॅबमध्ये फॉर्म नं. १७ या विभागात उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज डाउनलोड करून आवश्यक तपशील भरावेत आणि संबंधित कागदपत्रांसह शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावेत.

प्रकल्प व्यवस्थापनवर
‘गोगटे’त मार्गदर्शन
रत्नागिरी ः गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्यावतीने ‘क्लासरूम ते क्लाऊड : गिटहबद्वारे प्रोजेक्ट व्यवस्थापन’ या विषयावर माहितीपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले. यात कौशिक मुसळे यांनी मार्गदर्शन केले. या सत्रात गिटहबच्या मदतीने प्रकल्प कसे व्यवस्थापित करावे, कोडिंगमध्ये सहकार्याची महत्त्वाची भूमिका तसेच क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शैक्षणिक प्रकल्प अधिक प्रभावी कसे बनवावेत याबाबत मुसळे यांनी मार्गदर्शन केले. ८७ विद्यार्थी यात सहभागी झाले.

ठाकरे सेनेची आज
खेर्डीत बैठक
चिपळूण ः ठाकरे गटाच्या शिवसेनेची बैठक शुक्रवारी (ता. २२) खेर्डी येथे होणार आहे. महाविकास आघाडीतील नेते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा ठाकरे गटाच्या शिवसेनेवर परिणाम होऊ नये यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे. आमदार भास्कर जाधव बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक खेर्डी जिल्हा परिषद गटापुरती मर्यादित असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या गटातून ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून खेर्डी येथील तेज हॉटेलच्या सभागृहात सायंकाळी सात वाजता बैठक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT