कोकण

दोडामार्ग मुख्यालय आहे की भंगार गोडाऊन0

CD

86118
86119
86120
86121
swt2127.jpg
दोडामार्ग ः इमारत परिसरात अशा अनेक जुन्या वस्तू पडलेल्या आहेत.

दोडामार्ग ‘तहसील’ : मुख्यालय की भंगार गोडाऊन?
कचऱ्याचे ढिगारे, सडलेली वाहने अन् डासांचा प्रादुर्भाव; नागरिक त्रस्त, जबाबदारी मात्र ढकलाढकलीत
संदेश देसाई ः सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २१ ः येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सडत असलेली अपघातग्रस्त वाहने, कचऱ्याचे साचलेले ढिगारे, इमारतीसमोर पडलेले खड्डे यामुळे तालुका मुख्यालय आहे की भंगाराचे गोडाऊन, असा प्रश्न पडत आहे. इमारतीत असलेले वेगवेगळे प्रशासकीय विभाग साफसफाई करण्यासाठी परस्परांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे मुख्यालय इमारत व आजूबाजूचा परिसर स्वच्छ कोणी करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन २६ वर्षे झाली. तालुक्याचे मुख्यालय इमारत म्हणजेच तहसीलदार इमारत झाली. या इमारतीमध्ये प्रत्येक विभागाच्या कार्यालयाने म्हणजेच पोलिस, कृषी, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक, ट्रेजरी या सर्वांनी आपली जागा ताब्यात घेतली आणि कार्यालये सुरू झाली; मात्र विषय आला स्वच्छतेचा. प्रत्येक विभागाने जागा ताब्यात घेतली; पण त्या कार्यालयाची, स्वच्छतागृह आणि सभोवतालच्या परिसराची स्वच्छता नेमकी करायची कोणी, हा प्रश्न बरीच वर्षे पडून होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी इथले तहसीलदार अमोल पोवार यांनी इमारतीमध्ये असलेल्या प्रत्येक कार्यालयाची बैठक घेऊन, प्रत्येक कार्यालयाने आपल्या कार्यालयासमोरील स्वच्छता तसेच इथल्या स्वच्छतागृहाची स्वछता ठेवावी, अशा सक्त सूचना केल्या होत्या त्याअनुषंगाने काही दिवस स्वच्छता केली गेली; मात्र तहसीलदार पोवार काही महिन्यांपासून रजेवर गेल्यामुळे पुन्हा ''येरे माझ्या मागल्या'' असा कारभार पुन्हा सुरू झाला. इमारतीमध्ये अस्वच्छता, स्वच्छतागृहाची दुरवस्था यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सध्या पावसाळा सुरू असताना कार्यालयाच्या ठिकाणी आलेल्या नागरिकांनी पावसात जायचे कुठे? पुरुष मंडळी पावसात कुठेतरी उघड्यावर जाऊ शकतात; मात्र महिला वर्गाने करायचे काय, अशा प्रकारे अनेक प्रश्न या तालुका मुख्यालय इमारतीमध्ये उपस्थित होत आहेत.
मुख्यालय इमारत अस्वच्छता आणि सभोवतालच्या परिसरातील वाढलेली झाडेझुडपे, वाहने, खड्डे यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यात डासांची संख्या वाढल्यामुळे या इमारतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आतील स्वच्छतेबरोबर सभोवतालच्या परिसराची स्वच्छता करणे गरजेचे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नादुरुस्त असलेले स्वच्छतागृह दुरुस्त करून ते नागरिकांच्या सेवेत आणणे महत्त्वाचे आहे. तालुक्याची मुख्यालय इमारत नवीन असताना पाच वर्षांतच ती नादुरुस्त झाल्याचे तालुकावासियांकडून बोलले जात आहे. एवढा गैरकारभार सुरू असताना शासन याकडे गांभीर्याने का बघत नाही? स्वच्छता, डागडुजी, वाहनतळ या सर्व समस्या कधी सुटतील, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेमधून विचारला जाता आहे.

चौकट
जप्त वाहनांचे करायचे काय?
मुख्यालय इमारतीच्या आतील स्वच्छतेचा विचार करताना इमारत आवारातील स्वच्छतेचा विषय ऐरणीवर आला आहे. अपघातग्रस्त वाहने, पोलिसांनी आणि महसूलने जप्त केलेली वाहने सध्या तहसील इमारतीच्या आवारात सडत आहेत. या उभ्या करून ठेवलेल्या वाहनांमुळे इमारतीची शोभा कुठेतरी हरवत चाललेली दिसत आहे. या वाहनांमुळे आजूबाजूचा परिसरदेखील झाडाझुडपांनी वेढलेला आहे. सडत असलेल्या या वाहनांचे पुढे काय? त्यांची व्हिलेवाट कशी होणार, लिलाव होणार की स्क्रॅप होणार? हे दोन्ही विभागांनी जातीनिशी लक्ष घालून या अपघातग्रस्त व जप्त केलेल्या वाहनांचा प्रश्न सोडविणे अत्यावश्यक आहे.

चौकट
वाहन पार्किंगची जबाबदारी कोणाची?
मुख्यालंय इमारतीमध्ये प्रत्येक विभागाचे कार्यालय असल्यामुळे या ठिकाणी अनेक वाहने ये-जा करतात. या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे येणारा प्रत्येक जण मनाला वाटेल तिथे गाडी उभी करतो. त्यामुळे इतर वाहनचालक किंवा येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने बेशिस्तपणे उभी करावी लागतात. स्वचछतेचा विषय प्रत्येक कार्यालयाचा झाला, तर वाहन पार्किंग व्यवस्था नेमकी करायची कोणी? हा प्रश्न प्रभारी तहसीलदार सोडवतील काय, असा प्रश्न इथले कर्मचारी तसेच सर्वसामान्य जनतेमधून विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT