कोकण

जिल्ह्यातील रस्त्यांची तत्काळ डागडूजी करा

CD

swt2212.jpg
86388
सिंधुदुर्गनगरी ः येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी आढावा बैठक घेतली.

जिल्ह्यातील रस्त्यांची
तत्काळ डागडूजी करा
नितेश राणेः सिंधुदुर्गनगरीतील आढावा बैठकीत सूचना
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २२ः सततच्या पावसामुळे ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे सोमवार (ता.२५) पर्यंत सर्व रस्त्यांची डागडूजी आणि दुरुस्तीची कामे पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नयेत यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे, असेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, समिती सदस्य प्रभाकर सावंत, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री राणे म्हणाले, “गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारांवर व रेल्वे स्थानकांवर आरोग्य पथके नियुक्त करा. औषधसाठा पुरेसा उपलब्ध ठेवा. साथीचे आजार पसरू नयेत याकडे विशेष लक्ष द्या. राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्ग आणि जिल्हा परिषद अखत्यारीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करा.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Sonography: कारमध्येच करायचे सोनोग्राफी! नाशिकमध्ये अवैध गर्भलिंगनिदान करणारं रॅकेट उघडीकस, कंपनीवरही गुन्हा

Latest Marathi News Live Update : धमकी देऊन कोणीही विकासाचे राजकारण करू नये, महसूल मंत्र्यांचा मकरंद पाटील यांच्यावर टीका

तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अभिनेत्यासोबत रोमान्स, लंडनच्या गुलाबी थंडीतील व्हिडिओ, ट्रेलर चर्चेत

Horoscope Prediction : 7 डिसेंबरपासून मंगळ बदलणार त्याची चाल; 5 राशींचा गोल्डन टाईम सुरु, प्रोमोशन नक्की !

Weight Loss Plan : पोटभर भात-भाकरी-ब्रेड खावूनही 7 दिवसांत कमी केले 1.7Kg वजन; तुम्हीही फॉलो करू शकता ही स्मार्ट पद्धत

SCROLL FOR NEXT