कोकण

देवबागवासीयांचा विकास हेच ध्येय

CD

swt239.jpg
86540
देवबाग : सरपंच उल्हास तांडेल यांनी अन्य सदस्यांसह जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.

देवबागवासीयांचा विकास हेच ध्येय
सरपंच उल्हास तांडेल : कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ : आमदार नीलेश राणे यांच्या कार्यपध्दतीमुळे मतदारसंघातील विकासाला वेग मिळाला आहे. त्यांच्या या विकासकामांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना भुरळ पाडली आहे. देवबाग गावासाठी १५८ कोटी रुपयांचा बंधारा त्यांनी मंजूर केला. गावाच्या विकासासाठीच शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून, पुढील दोन वर्षांत गावाचा कायापालट करण्याचे ध्येय आहे, असे मत देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांनी व्यक्त केले.
शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली देवबाग येथील ठाकरे गटाचे सरपंच तांडेल व ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी तांडेल व त्यांच्या सहकाऱ्यांचे सामंत यांनी शिवसेनेत स्वागत केले.
भविष्यात ही संख्या आठपर्यंत नेण्याची जबाबदारी आपली असल्याचे तांडेल यांनी सांगितले. आगामी काळात दत्ता सामंत आणि राणे कुटुंबाला अपेक्षित असे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले.
तांडेल यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य रूपाली मोंडकर, अण्णा केळुसकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, बाळू नाटेकर, मंदार लुडबे, अरुण तोडणकर, अंजना सामंत, नीलेश सामंत, घनःश्याम बिलये, बाळा निकम, काका पेडणेकर, प्रतीक्षा चोपडेकर, दशरथ राऊळ, बाबी कासवकर, ज्ञानेश्वर धुरी, एन्जॉय तुळसकर, मिनीन लुद्रिक उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे मालवणमधील शिवसेनेची ताकद वाढली असून, ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 world Cup Final नंतर आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद अहमदाबादला! आज झाला मोठा निर्णय

India's Test Downfall: तुला हवं ते सर्व दिलं अन् तू टीम इंडियाचं वाटोळं केलंस! गौतम गंभीरच्या हट्टापाई कसोटीत आपली पिछेहाट...

SMAT 2025: ऋतुराज गायकवाडने मोडले विराट-गिलचे विक्रम, पण महाराष्ट्राचा पहिल्याच सामन्यात पराभव; पृथ्वी शॉही अपयशी

Barshi News : अखेर बार्शीच्या 'त्या' ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा मृत्यू; नोकरीवरुन काढून टाकण्याची दिली होती धमकी

Latest Marathi News Live Update: हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

SCROLL FOR NEXT