कोकण

लोटेश्वर डुगवे येथे बेलाच्या रोपांचे वाटप

CD

-rat२३p७.jpg-
२५N८६५२२
रत्नागिरी : लोटेश्वर डुगवे येथे डॉ. दिलीप नागवेकर व कुटुंबीयांनी बेलाच्या रोपांचे वाटप केले. त्या प्रसंगी श्री देव रवळनाथ मंदिर पदाधिकारी, गावकर आदी.
---
लोटेश्वर डुगवे येथे बेलाच्या रोपांचे वाटप
डॉ. नागवेकर कुटुंबीय ः चार वर्षे जपताहेत परंपरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : तालुक्यातील डुगवे गावी मोठ्या पऱ्यात (वहाळात) लोटीसारख्या जांभा दगडावर जुने शंकराचे मंदिर आहे. भगवान शंकराला बेल वृक्ष आवडीचा आहे. त्यामुळे डॉ. दिलीप नागवेकर आणि त्यांचे कुटुंबीय २०२२ पासून बेलरोपांचे वाटप करत आहेत. तोणदे, पोमेंडी, सोमेश्वर, राजीवडा परिसर आणि यावर्षी डुगवे गावी बेलरोपांचे वाटप केले.
श्री देव रवळनाथ मंदिरात कार्यक्रमाप्रसंगी डुगवे गावचे गावकर दिगंबर आग्रे यांनी स्वागत केले. मंडळाचे अध्यक्ष मारुती गोविलकर, खजिनदार नीलेश भोवड, सचिव संदिप फुटक, पोलिस पाटील दत्ताराम भोवड, डॉ. दिलीप नागवेकर, दीपिका नागवेकर, जयवंत नागवेकर, कुंदन सुर्वे, तोणदेच्या माजी सरपंच शिल्पा सुर्वे, नंदकुमार सुर्वे यांच्या हस्ते बेलरोपांचे वाटप कराण्यात आले.
डॉ. नागवेकर यांनी बेलवृक्षाचे माहात्म्य आणि महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगितले. बेल व अन्य वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे समतोल राखण्याचे आवाहन केले. यावर्षी या रोपांची लागवड करून ती जगवून पुढच्या वर्षी श्रावण सोमवारी स्वत:च्या झाडांची बिल्वपत्रे लोटेश्वराला अर्पण करूया, असे आवाहन कुंदन सुर्वे आणि शिल्पा सुर्वे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश नागवेकर, डुगवे ग्रामस्थ आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
----
कोट
श्रावण महिन्यानिमित्त आम्ही नागवेकर कुटुंबीय दरवर्षी बेलरोपांचे वितरण करत आहोत. बेलरोपे सर्वांनी जगवावीत. निसर्गरक्षण व पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष लागवड अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त एकतरी झाड लावावे व ते जगवावे.
- डॉ. दिलीप नागवेकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT