-rat२४p३३.jpg-
२५N८६७७४
राजापूर ः महावितरण विभागाला निवेदन देताना सागवे येथील भाजप पदाधिकारी.
------
सागवेत वारंवार वीजपुरवठा खंडित
ग्राहकांची गैरसोय ; एकच कंत्राटी वायरमन कार्यरत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येची ग्रामपंचायत असलेल्या सागवे गावातील ग्रामस्थांना गेल्या चार महिन्यापासून सातत्याने खंडीत होणारा वीजपुरवठा, कमी-जास्त दाबाने होणारा वीजपुरवठा आदी विजेच्या समस्यांना तोंड द्यावा लागत आहे. येथील ग्राहकसंख्या आणि भौगोलिक रचना पाहता विजेची समस्या तत्काळ दूर करण्यासाठी किमान चार वायरमनची आवश्यकता आहे. मात्र, या ठिकाणी एकाच वायरमनची तोही कंत्राटी वायरमनची नेमणूक करण्यात आली आहे. याकडे लक्ष वेधून आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तत्काळ मुख्य वायरमनची नेमणूक करावी, अन्यथा वीजबिले न भरताना तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपच्या सागवे विभागातर्फे देण्यात आला आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून तालुकावासियांना सातत्याने खंडीत होण्यासह कमी-जास्त दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या दूर करण्याची सातत्याने मागणी करून अद्यापही झालेली नसल्याने राजापूरवासीय त्रस्त झाले आहे. अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असताना विजेच्या समस्येने राजापूरवासीयांची चिंता वाढवली आहे. यामध्ये सागवे गावातील ग्रामस्थ विजेच्या समस्येने पुरते हैराण झाले आहे. या ठिकाणी तीन ते चार मुख्य वायरमनची आवश्यकता आहे. मात्र, सध्या या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाचा एकच वायरमन कार्यरत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. तत्काळ मुख्य वायरमनची नेमणूक करावी, अन्यथा त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपच्या सागवे विभागातर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.