कोकण

मोबाईलचा संयमित वापर आवश्यक

CD

swt253.jpg
86942
कुडाळः समुपदेशक रुफा नाईक यांचे स्वागत करताना मुख्याध्यापिका मुमताज शेख, वैशाली शेट्टी आदी.

मोबाईलचा संयमित वापरच विद्यार्थ्यांसाठी हितावह
मानसशास्त्रीय समुपदेशक रुफा नाईकः कुडाळ इंग्रजी माध्यम शाळेत व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ः मोबाईलचा वापर अभ्यासासंदर्भातील गोष्टींसाठी करा. मोबाईलच्या संयमित व योग्य वापराने संभाव्य नुकसान टाळू शकतो, असे प्रतिपादन मानसशास्त्रीय समुपदेशक रुफा नाईक यांनी केले. येथील क. म. शि. प्र. मंडळाची इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेत आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.
क. म. शि. प्र. मंडळाची इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेत ‘मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम’ यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलच्या दुष्परिणामांविषयी जागृती निर्माण व्हावी, हा होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका मुमताज शेख यांनी प्रमुख पाहुण्या व व्याख्यात्या रुफा नाईक व पालक-शिक्षक प्रतिनिधी प्रल्हाद नाईक यांचे पुष्प देऊन स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या नैराश्य, भीती, विचार या मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल माहिती दिली. मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारा शारीरिक व मानसिक परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.
व्याख्यानादरम्यान त्यांनी मुलांशी सुसंवाद साधला. छोटे-छोटे खेळ घेऊन मुलांना मोबाईलच्या दुष्परिणामांची माहिती दिली. मोबाईलचा शरीरावर होणारा परिणाम तसेच सायबर सुरक्षितता आणि मुलांसाठी असलेले ऑनलाईन ‘स्कॅम्स’ याविषयीही विद्यार्थ्यांना सावध केले. या व्याख्यानात मोबाईल वापराबाबत पालकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट करण्यात आले.
डिजिटल जीवनामध्ये संतुलन कसे राखावे तसेच पालक, शाळा आणि समाजाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मोबाईलचा संयमित व योग्य वापर करण्याचा महत्त्वाचा संदेश मिळाला. मोबाईलचा वापर हा अभ्यासासंदर्भातील गोष्टींसाठी करावा, हे देखील सांगण्यात आले.
या व्याख्यानाला प्रशालेतील सहशिक्षक पूर्वा राऊळ, पूजा खानोलकर, दिव्या खानोलकर, सूरज गोसावी उपस्थित होते. सहशिक्षिका वैशाली शेट्टी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SA 1st Test: पाकिस्तानचा अजब कारभार! बंदी घातलेल्या आफ्रिदीला कसोटी संघात निवडले, ३८ व्या वर्षी पदार्पणाची संधी

Municipal Elections: हिवरखेड नगर परिषदची सूत्रे अकरा महिलांच्या हाती! ईश्वर चिठ्ठ्या निर्णायक; नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव

Naxal IED Blast: नक्षलवाद्यांकडून पुन्हा भ्याड हल्ला! आयईडी स्फोटात १ जवान शहीद तर...; जखमींमध्ये आमदारांच्या भावाचाही समावेश

Latest Marathi News Live Update : रोहित पवारांनी दाखवला देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ

Tech Layoffs: टेक क्षेत्रातील 50,000 नोकऱ्या धोक्यात; TCSसह अनेक कंपन्या कर्मचारी कपातीच्या तयारीत, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT