swt2513.jpg
N87011
सावंतवाडी ः स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व इतर पदाधिकारी.
सावंतवाडीत कामगार संप मिटला
बैठकीत तोडगा ः माजी नगराध्यक्ष साळगावकरांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः येथील नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या संपाबाबत आज प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला. आम्हाला न्याय देण्याचा शब्द मिळाल्याने सावंतवाडी शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी घेत संप मागे घेत असल्याचे सफाई मित्रांनी जाहीर केले. यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुढाकार घेतला.
कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात शहरातील प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी निकम, तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, अभय पंडीत, दीपक सावंत, मनोज घाटकर तसेच नगरपंचायतीचे अधिकारी वैभव अंधारे, प्रसाद बटवाल, विनोद सावंत, दीपक म्हापसेकर आदींसह कंत्राटी सफाई कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रातांसमोर सफाई मित्रांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. नगरपंचायतीकडून ठेकेदाराला आमचे मानधन अदा होते. मात्र, १९ हजार मानधन ठरलेले असताना १५ हजार एवढेच मिळते. चालक, सफाई कामगारांच्या पगारात तफावत दिसते. त्यामुळे आमच्या घामाची उर्वरीत रक्कम जाते कुठे0 असा सवाल केला. तर आम्हाला पगार चिठ्ठी, पगार पावती दिली जात नाही असेही कामगार म्हणाले. तसेच अनेक वर्षाचे कामगारांचे प्रोविडंट फंडचे पैसे देखील दिले जात नसल्याचा आरोप सफाई कामगारांनी केला.
यावेळी कामगारांचे पीएफचे पैसे भरल्याशिवाय कंत्राटदारांशी पुढचे व्यवहार करू नका. तसेच कामगारांचे पीएफचे पैसे बुडविणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले. दरम्यान, नगरपरिषद ३८ सफाई कर्मचाऱ्यांचे नवीन टेंडर आजच काढण्यात येत आहे. जानेवारीपासून नवीन दर ठरवून दिले आहेत. त्यांना मंजूरी मिळावी म्हणून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. नवीन दराप्रमाणे सफाई कामगारांना ७६५ तर चालकांना ९४९ रूपये मंजूरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचे घामाचे पैसे बुडणार नाहीत याची दक्षता घ्या, संबंधित ठेकेदाराला बोलावून घेत सर्वांसमक्ष गुरूवारी (ता.२८) नगरपरिषद कक्षात बैठक लावण्याच्या सुचना देत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन प्रांताधिकारी निकम यांनी दिले. त्यांच्या आश्वासनानंतर सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
चौकट
''हक्काचा पैसा मिळवून देऊ''
माजी नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, "शहरात पसरलेला कचरा मनाला वेदना देत होता. सणाच्या पार्श्वभूमीवर कामगारांचं आंदोलन मागे घेण आवश्यक होते. यासाठी प्रांताधिकारी यांच्याशी समन्वय साधला. त्यांच्या आश्वासनानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे. तर पीएफ बुडविणाऱ्या ठेकेदाराने पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रांतांनी दिले आहेत. तसेच कामगारांचा घामाचा पैसा कुठे जिरतो0 हे आम्ही बघू, त्यांचा हक्काचा पैसा मिळवून देऊ, असा विश्वास श्री. साळगावकर यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.