कोकण

-फुटबॉल लीग स्पर्धेत युवराज स्पोर्ट्स विजयी

CD

- rat२६p१.jpg-
P२५N८७१४८
संगमेश्वर ः फुटबॉल लीग स्पर्धेत विजयी झालेल्या युवराज स्पोर्ट्स संघाला चषक प्रदान करताना रोहन बने.
---
फुटबॉल लीगमध्ये युवराज स्पोर्ट्स विजयी
युवासेना चषक स्पर्धा ; महापुरुष फायटर्स उपविजयी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः तालुका शिवसेना आणि युवासेना आयोजित युवासेना चषक २०२५ जिल्हास्तरीय फुटबॉल लीग स्पर्धेत युवराज स्पोर्ट्स देवरूखने महापुरुष फायटर्सला पराभूत करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.
युवासेना चषक २०२५ जिल्हास्तरीय फुटबॉल लीग स्पर्धा पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर झाली. या स्पर्धेचे उद्‍घाटन तालुक्याचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, युवासेना जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई, आमदार किरण उर्फ भैया सामंत, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आदी उपस्थित होते. या स्पर्धेत आस्था देवळे, शुभम वॉरियर्स, शिवगर्जना फायटर्स, सह्याद्री नगर वॉरियर्स, महापुरुष फायटर्स या संघांनी भाग घेतला होता. या सर्व संघात झालेल्या अतिशय चुरशीच्या लढतींना प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. स्पर्धेतील अंतिम सामना युवराज स्पोर्ट्स आणि महापुरुष फायटर्स यांच्यात झाला. या लढतीत युवराज स्पोर्ट्स संघाने चतुरस्र खेळ करत विजेतेपदावर नाव कोरले आणि युवासेना चषक पटकावला. महापुरुष फायटर्स संघ उपविजेता ठरला तर सह्याद्री नगर वॉरियर्स संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
पारितोषिक वितरणावेळी आमदार किरण सामंत यांनी ग्रामीण भागात क्रीडासंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असून, खेळाडूंना नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला तसेच तालुक्यातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी असेच विविध उपक्रम भविष्यात राबवले जातील, असे शिवसेना युवानेते व आयोजक रोहन बने यांनी सांगितले.
---
क्रीडा शौकीनांची गर्दी
फुटबॉल लीग स्पर्धा पाहण्यासाठी संगमेश्वरसह जिल्ह्यातील फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये नवोदित खेळाडूंचा मोठा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's Test Downfall: तुला हवं ते सर्व दिलं अन् तू टीम इंडियाचं वाटोळं केलंस! गौतम गंभीरच्या हट्टापाई कसोटीत आपली पिछेहाट...

SMAT 2025: ऋतुराज गायकवाडने मोडले विराट-गिलचे विक्रम, पण महाराष्ट्राचा पहिल्याच सामन्यात पराभव; पृथ्वी शॉही अपयशी

Barshi News : अखेर बार्शीच्या 'त्या' ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा मृत्यू; नोकरीवरुन काढून टाकण्याची दिली होती धमकी

Wagholi News : आठवीत शिकणाऱ्या मुलाची चिट्ठी लिहून मुलीला जीवे मारण्याची धमकी

Latest Marathi News Live Update: महापालिकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम लांबणीवर

SCROLL FOR NEXT