कोकण

कोकण रेल्वे मार्गाचा प्रवास अधिक सुरक्षित होणार

CD

-rat२६p१०.jpg-
P२५N८७१६५
सचिन वहाळकर
----------
‘कोरे’चा प्रवास अधिक सुरक्षित होणार
सचिन वहाळकर ः गुन्ह्याचा तपास वेगाने होईल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ : कोकण रेल्वेवरील स्थानकांची जबाबदारी आता रेल्वे पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. त्याचे स्वतंत्र कार्यालय रत्नागिरी येथे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात कोकण रेल्वे आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. घडलेल्या गुन्ह्यांचा तपास तत्काळ होण्यास मदत मिळेल, असा विश्वास कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी ''सकाळ''शी संवाद साधताना व्यक्त केला.
रत्नागिरी रेल्वेस्थानकातील रेल्वे पोलिस ठाण्याचे उद्‌घाटन सोमवारी (ता. २५) ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. या पार्श्वभूमीवर चिपळूणच्या विभागीय कार्यालयात ‘सकाळ’शी संवाद साधताना ते म्हणाले, रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी रेल्वेसुरक्षा दलाकडे (आरपीएफ) आहे. रेल्वेस्थानके, रेल्वे परिसर, मार्गावरील गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्यांची उकल करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे. हे खाते गृहमंत्री यांच्या अधिपत्याखाली चालते. रोहानंतर कोकणातील रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांची रेल्वे परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षादल आणि स्थानिक पोलिस ठाण्याची आहे. काही वर्षांत कोकण रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. मोबाईल चोरी, सोनसाखळी खेचणे, महिलांची छेडछाड, मारामारी अशा घटना वाढल्याने या ठिकाणी रेल्वे पोलिस ठाण्याची उभारणी करणे अत्यावश्यक होते.
कोकण रेल्वेहद्दीत गुन्हा घडल्यास त्याची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात करावी लागत होती. त्यामुळे कोकण रेल्वेवरील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयाकडे दिली आहे. त्याचे कार्यालय रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सुरू झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्वरित तक्रार करणे सोयीस्कर होईल. रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोलाड ते राजापूर रेल्वेस्थानकाचा भाग असेल. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण झाल्यानंतरही ही सुविधा कायम राहणार असल्यामुळे वहाळकर यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Car Blast : दिल्ली स्फोटातील कार कोण चालवत होतं? डीएनए जुळला, धक्कादायक माहिती समोर

Asia Cup Selection: जालनाच्या तेजल साळवेची कमाल! आंतरविद्यापीठीय सुवर्णपदकानंतर आशिया कपसाठी भारतीय संघात निवड

कऱ्हाडच्या वन विभागाची माेठी कारवाई! 'रानडुकरांची तस्करी करणारी नऊ जणांची टाेळी जेरबंद'; रात्रभर गस्त, बीडमधून रानडूकर आणलं अन्..

Pune Airport: दिल्ली स्फोटानंतर पुणे विमानतळावर कडक तपासणी; प्रवाशांना वेळेच्या किमान तीन तास आधी दाखल होण्याची सूचना

शेतकऱ्यांनो, आजच करा ‘ई-केवायसी’! पूर अन्‌ अतिवृष्टीच्या मदतीसाठी 8 दिवसांसाठी पोर्टल उघडले; सोलापूर जिल्ह्यातील 4.15 लाख शेतकऱ्यांचे 1100 कोटी अडकले

SCROLL FOR NEXT