कोकण

विमा परताव्याचे निकष विमा कंपनीने जाहीर करावे

CD

-rat२६p१८.jpg-
२५N८७१९४
राजापूर ः बागातदार, शेतकरी, महसूल, कृषी विभागाचे अधिकारी यांच्याशी संवाद साधताना आमदार किरण सामंत.
------------
विमा परताव्याचे निकष जाहीर करा
आमदार सामंत ः पंचनाम्याबाबतही केल्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः हंगाम २०२४-२५चा विमा परतावा, त्याचे निकष विमा कंपनीने जाहीर करून लवकरात लवकर पीकविमा परतावा देण्यात यावा, कोकणातील स्थानिक वातावरणानुसार विम्याचे निकष ठरवण्यात यावेत. याबाबत वरिष्ठांकडून तत्काळ निर्णय घेऊन कारवाई करावी. एप्रिल-मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तत्काळ करावेत, अशा सूचना आमदार किरण सामंत यानी दिल्या. आंबा बागायतदारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.
राजापूर-लांजा तालुक्यातील आंबा बागायतदारांच्या समस्यांसंबंधात राजापूर शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीमध्ये सामंत बोलत होते.
ते म्हणाले, यावर्षीचा आंबा हंगाम संपून सुमारे अडीच महिन्याचा कालावधी उलटला तरी बागायतदारांना अद्यापही पीकविमा परतावा मिळालेला नाही. या संबंधित शेतकरी, बागायतदार यांनी निवेदन दिले होते.
या वेळी पीकविमा आकारणी पूर्वीप्रमाणे खराब्यासहित करणे शक्य नसल्याने सातबारावरील खराबा क्षेत्राचे वरकसमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी तहसीलदार व भूमी अभिलेखमार्फत उपाययोजना करण्यात याव्यात, पीकविमा कालावधी १ ऑक्टोबर ते ३१ मे असा असावा, कीटकनाशके, खते आदींच्या किमतीवर नियंत्रण असावे, थ्रीप्स, तुडतुडे आदी रोगांवर परिणामकारक प्रभावी कीटकनाशकांचा वापर करण्याबाबत संशोधन व्हावे, शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर मेळाव्यांच्या आयोजनासह शेतकरी-शास्त्रज्ञ मंच स्थापना करावी, वानर-माकडांच्या त्रासावर उपाययोजना, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांचा एआय तंत्रज्ञानामध्ये समावेश व्हावा, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असावी, सर्व शेतकरी कर्जदारांना सरसकट कर्जमाफी मिळावी, आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

चौकट ः
बिनव्याजी कर्जाची मर्यादा १० लाख करा
बागायतदार, शेतकरी यांना बँकांमार्फत तीन लाखापर्यंत देण्यात येणाऱ्‍या बिनव्याजी कर्जाची मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी. सध्या असलेली प्रतिझाड २ हजार २०० रुपये ही मर्यादा वाढवून ती जेवढी जास्तीत जास्त करता येईल त्या बाबतीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठ प्रतिनिधी यांनी त्याबाबत नव्याने निकष ठरवावेत, अशी सूचना आमदार किरण सामंत यांनी बँक प्रतिनिधींसह कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Delhi Red Fort blast Live Update : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रूग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट; घटनास्थळाचीही पाहणी केली

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

SCROLL FOR NEXT