कोकण

दीड दिवसांच्या गणरायांना आरोंद्यात भावपूर्ण निरोप

CD

swt293.jpg
N87883
आरोंदाः येथे दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

दीड दिवसांच्या गणरायांना
आरोंद्यात भावपूर्ण निरोप
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २९ : पंचक्रोशीत गणेशोत्सव नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी पावसाने धावपळ उडवली असली, तरीही चतुर्थीच्या दिवशी आरोंदावासीयांनी आपल्या घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना व पूजन मोठ्या भक्तिभावाने केले.
वर्षभर ज्या आतुरतेने गणरायाच्या आगमनाची वाट पाहिली जाते, त्या प्रतीक्षेला अखेर २७ ला उत्सवाने पूर्णविराम मिळाला. पावसाच्या लहरींनी थोडा अडथळा निर्माण केला असला, तरी भक्तांच्या उत्साहात कोणतीही कमी पडली नाही.
गावातील दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे काल (ता.२८) सायंकाळी भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. यावेळी सर्व गणेशमूर्ती एकत्र आणून भजन, आरती पार पाडण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात व फटाक्यांच्या रोषणाईत आरोंदावासीयांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गणरायाच्या आगमनामुळे गावात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र, निरोपाच्या क्षणी ग्रामस्थांना भावनिक होत, जड अंतःकरणाने गणरायाला निरोप द्यावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Latest Marathi News Live Update : कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई: हावडा-दुर्गापूरमध्ये २४ ठिकाणी छापे

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

Girija Oak Favorite Dish: नॅशनल क्रश गिरीज ओकचं सीक्रेट रिव्हील! नागपूरची ही एक वडी… जिचं नाव ऐकून स्टारचंही मन हरवलं!

SCROLL FOR NEXT