कोकण

मळगाव येथे गणेश सजावट स्पर्धा

CD

मळगाव येथे
गणेश सजावट स्पर्धा
मळगाव : गावात गणेशोत्सव २०१५ निमित्त घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भिल्लवाडी ग्रुप अध्यक्ष तथा समाजसेवक पांडुरंग राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांसाठी अनुक्रमे ५,००१, ३,००१ आणि २,००१ रुपयांची बक्षिसे आहेत. त्याशिवाय अन्य उत्तेजनार्थ बक्षिसेदेखील प्रदान केली जातील. स्पर्धेच्या नियमांनुसार, प्रत्येक स्पर्धकाने एक मिनिटाचा व्हिडिओ तयार करून इन्स्टाग्रामवर किंवा आयोजकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवावा. व्हिडिओखाली स्पर्धकाचे नाव व मोबाईल क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. स्पर्धा फक्त मळगाव गावापुरती मर्यादित असून, या स्पर्धेत सहभागासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. अधिक माहितीसाठी पांडुरंग राऊळ यांच्याशी संपर्क साधावा.
----------------
काजू मंडळाच्या संचालक
मंडळाची नवी पुनर्रचना
कणकवली : शासनाने राज्य काजू मंडळाच्या संचालक मंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काजू मंडळाचे व्यावसायिक कार्यालय वाशी, नवी मुंबई येथे असणार आहे, तर नोंदणीकृत मुख्यालय वेंगुर्ल्यात असणार आहे. काजू पीक विकासासाठी स्थापन काजू मंडळात चार स्वतंत्र संचालकांऐवजी ११ स्वतंत्र संचालक असणार आहेत. यात पणनमंत्री हे अध्यक्ष असणार असून, राज्य कृषी पणन मंडळ, पुणेचे कार्यकारी संचालक, अपेडाचे उपसरव्यवस्थापक तसेच कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधून काजू प्रक्रिया उद्योजक प्रत्येकी एक, काजू उत्पादक शेतकरी प्रत्येकी एक, सहकारी काजू प्रक्रिया प्रकल्पांचा महासंघ यांचा एक प्रतिनिधी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील काजू प्रक्रिया तज्ज्ञ एक, काजू निर्यातदार क्षेत्रातील एक, काजू क्षेत्रात अनुभव असलेले दोन तज्ज्ञ संचालक तसेच सदस्य सचिव हे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत.
-----------------
पूजन साहित्याचे
वेंगुर्लेत वाटप
वेंगुर्ले : गणेशोत्सवानिमित्त संदेश निकम मित्रमंडळातर्फे मंडळाचे संस्थापक माजी नगराध्यक्ष संदेश निकम व माजी नगरसेविका सुमन निकम यांनी गणेश भक्तांना पूजा साहित्याचे वाटप केले. गणेश पूजन साहित्यासह तेल व मोदक वितरण कार्यक्रमाचा प्रारंभ संदेश निकम यांनी दाभोली नाका येथील कार्यालयात केला. यावेळी दाजी नांदोसकर, वैभव फटजी, दाभोली उपसरपंच पपल बांदेकर, युवासेनेचे सिद्धेश कोले, अविनाश सडवेलकर, रँक्स परेरा, पप्पा गावडे, विकी फर्नांडिस, पिंटू धवडे, श्री. पवार, श्री. मयेकर उपस्थित होते.
---------
सावंतवाडीत भाजपतर्फे
वह्या वाटप, सत्कार
सावंतवाडी : भाजप शहर मंडलतर्फे वि. स. स. खांडेकर विद्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. विभाग रोलर स्केटिंग १७ वर्षांखालील स्पर्धेसाठी जान्हवी दीपक जाधव व जिल्हा कॅरम स्पर्धेसाठी आदर्श पाटील यांची निवड झाली. त्यांचा सत्कार करण्यात आला. शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर, संजू शिरोडकर, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, मुख्याध्यापक राजाराम पवार, सतीश धुमाळे, परीट, सौ. शृंगारे, मयुरी इन्सुलकर आदी उपस्थित होते.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

Maratha Protest: आंदोलकांसाठी आझाद मैदानात महापालिकेचा पुढाकार; पिण्याचे पाणी, शौचालयासह अनेक सुविधा उपलब्ध

Latest Maharashtra News Updates live: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

सोनू सूदने केला स्टार प्लसच्या नवीन शो 'संपूर्णा'चा ट्रेलर लॉन्च

SCROLL FOR NEXT