- rat३०p१२.jpg-
२५N८८१५७
आरवली-संगमेश्वर मार्गावर पडलेले खड्डे.
आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे
महामार्गाची दुरवस्था भक्तांचा प्रवास खड्ड्यातूनच
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३० ः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे दिलेली आश्वासने हवेत विरल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेल्या मुंबईकरांना चांगलाच फटका बसला आहे. प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या दूरवस्थेबाबत संगमेश्वर सोनवी पुलाजवळ उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी महामार्ग अभियंता अनामिका जाधव आणि अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांनी ठेकेदार कंपनीला फटकारले होते तसेच खड्डे बुजवणे, डांबरीकरण करणे, गौण खनिज भरलेल्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे यांसह सर्व कामे गणेशोत्सवापूर्वी मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते; मात्र प्रत्यक्षात हे आश्वासन पाळले गेले नाही. सध्या रस्त्यावर केवळ वरवर खडी टाकून तात्पुरता तोडगा काढला जात असल्याने खड्डे पुन्हा दिसू लागले आले आहेत. परिणामी, वाहनधारकांना सावकाश गतीने प्रवास करावा लागत असून, त्यातून वाहतूककोंडी निर्माण होत आहे. यासाठी पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय महामार्गावरून अवजड वाहने बेफिकीरपणे चालवण्यात येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेकांना जीव गमवावे लागलेले आहेत. असे असतानाही महामार्ग विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार सतत दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांसह प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.